बच्चन कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, बिग बी पुन्हा झाले आजोबा

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल...  

Updated: Feb 4, 2022, 12:18 PM IST
बच्चन कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, बिग बी पुन्हा झाले आजोबा  title=

मुंबई :  बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पण अभिनेत्री जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जण चिंतेत आहे. अमिताभ आणि जया यांची भाची नयना बच्चन आई झाली आहे. सांगायचं झालं तर बिग बी पुन्हा आजोबा झाले आहेत. 

नयना बच्चन आणि 'रंग दे बसंती फेम' अभिनेता कुणाल कपूर आई-वडील झाले आहेत. या गोष्टीची घोषणा कुणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. नयना बच्चन ही अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ यांची मुलगी आहे आणि कुणाल त्यांचा जावई आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर करताना कुणाल कपूरने लिहिले की, 'मला आणि नयनाला आमच्या सर्व शुभचिंतकांना हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही आता एका मुलाचे पालक आहोत.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

त्याने पुढे लिहिलं की, 'तुमचं प्रेम आणि देवाच्या आशीर्वादामुळे सर्व काही शक्य झालं.' सध्या कुणालची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नानंतर 7 वर्षांनंतर कुणाल आणि नयना आई-वडील झाले आहेत. 

कुणाल आणि नयना यांचं लग्न 2015 साली झालं होतं. आता त्यांनी सोशल मीडियावर मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.