पाहा, 'बसपन का प्यार'चं Badshah Version; सहदेवचा रॉकिंग अंदाज व्हायरल

बादशाहनं आपल्याच शैलीत हे गाणं तयार केलं आहे.

Updated: Aug 11, 2021, 09:58 PM IST
पाहा, 'बसपन का प्यार'चं Badshah Version; सहदेवचा रॉकिंग अंदाज व्हायरल
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'जाना मेरी जानेमन...' असं म्हणत एक लहान मुलगा चेहऱ्यावर शुन्य भाव ठेवून हे गाणं गायला आणि बस्स, वाऱ्याच्या वेगानं त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. सेलिब्रिटी, नेतेमंडळींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांमध्येच या मुलाची म्हणजेच सहदेवची वाहवा झाली. 

सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. अनपेक्षितपणे प्रसिद्धीझोतात आलेला हाच सहदेव दिरदो आता थेट सेलिब्रिटींसोबत झळकला आहे. सेलिब्रिटी रॅपर आणि गायक बादशाह यांनं सहदेवला मोठी संधी दिली असून, त्याच्यासोबत एक म्युझिक व्हिडीओ बनवला आहे. 

'बसपन का प्यार' गाणाऱ्या सहदेवला MG मोटर्सची कार नव्हे, मिळाले फक्त 'इतके' रुपये

 

बादशाहनं आपल्याच शैलीत हे गाणं तयार केलं आहे. सहदेव दिरदोसह या गाण्यात रिको आणि आस्था गिलही झळकत आहेत. बादशाहचा टच मिळालेलं हे नवं 'बचपन का प्यार', प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल झालं. अवघ्या काही तासांतच या गाण्याला 4 लाख व्ह्यूज मिळाले, कित्येकांनी हा व्हिडीओ शेअरही केला. 

सहदेवचा एकदम वेगळा लूक आणि अंदाज या गाण्याच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. एरव्ही शांत दिसणारा सहदेव या गाण्याच्या निमित्तानं मजेशीर अंदाजात दिसत आहे. बादशाहनं लिहिलेल्या या गाण्याच्या नव्या वर्जनला हितेननं संगीत दिलं आहे. सहदेवला संधी दिल्याबद्दल बादशाहवर अनेकांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे.