करिना कपूरच्या बाळाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना सबा अली खानकडून उत्तर

करीना कपूरने तिच्या नवीन पुस्तकातून आपल्या मुलाचं खरं नाव जहांगीर असल्याचं उघड केलं आहे.

Updated: Aug 11, 2021, 09:54 PM IST
करिना कपूरच्या बाळाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना सबा अली खानकडून उत्तर

मुंबई : करीना कपूरने तिच्या नवीन पुस्तकात आपल्या मुलाचं खरे नाव जहांगीर असल्याचं उघड केलं आहे. यानंतर युजर्सने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता सैफ अली खानची बहीण सबा अली खानने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे.

सबा अली खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सैफ, तैमूर अली खान आणि जेहचे फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबतच सबाने लिहिलं आहे की, 'करीना कपूर आणि सैफने आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आहे. जाहंगिर... नावात काय आहे. जगा, प्रेम करा आणि ते जे आहे ते होऊ द्या. मुलं देवाचा आशीर्वाद आहेत. 'विशेष म्हणजे, सबा अली खान इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती सैफ आणि सोहाच्या मुलांचे फोटो शेअर करते.

81 हजारांहून अधिक फॉलोअर्स
सबा अली खान बॉलिवूडपासून दूर आहे. सबा एक ज्वेलरी डिझायनर, टॅरो कार्ड रीडर आणि स्पिरिच्युअल हीलर आहे. ती अनेकदा तिच्या दागिन्यांचे डिझाईन सोशल मीडियावर शेअर करते. सबा अली खानने औकाफ-ए-शाही ट्रस्टची जबाबदारी स्वीकारली. हा ट्रस्ट भोपाळच्या भव्य वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. इन्स्टाग्रामवर त्याचे 81 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पुस्तकात केला खुलासा
करीना कपूर खानचं प्रेग्नेंसी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी 'हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. फोटोसह तिने मुलाचं नाव जहांगीर असल्याचं उघड केलं आहे. करीनाने तिच्या डिलिव्हरीपूर्वीचे आणि नंतरचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय करीनाने गर्भधारणेदरम्यान शरीरात कोणते बदल घडले हे सांगितलं आहे.