'बदला' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा सध्या यशाच्या शिखरावर आहे.

Updated: Mar 16, 2019, 06:24 PM IST
'बदला' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा सध्या यशाच्या शिखरावर आहे. समिक्षकांनी त्याचप्रमाणे चाहत्यांनी सिनेमाचे विशेष कौतुक केले आहे. फक्त एका आठवड्यांत सिनेमाने 49 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाचा आकडा ट्विटर शेअर केला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी ५ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली.मागील काही दिवसांत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट  कमाई केली. पण क्रिकेट सामण्याचे पडसाद सिनेमाच्या गल्लावर पडताना दिसले. प्रदर्शनानंतर सिनेमाने एकूण 49 कोटी रूपयांचा गल्ला जमवला.

 
सिनेमात अमिताभ बच्चन हे बादल गुप्ताची भूमिका साकारत आसून तापसी नयना सेठीच्या भूमिकेत दिसत आहे. 'बदला' सिनेमा 'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसत असून अभिनेत्री अमृता सिंग सुध्दा मुख्य भूमिकेत झळकत आहेत.