close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून ऍक्शनच नव्हे, तर आणखी एका कारणामुळेही 'साहो' गाजणार

... यांनी 'साहो'च्या पार्श्वसंगीताची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आहे

Updated: Jun 18, 2019, 04:54 PM IST
...म्हणून ऍक्शनच नव्हे, तर आणखी एका कारणामुळेही 'साहो' गाजणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'हे डार्लिंग्स...', असं म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांसमोर उभा राहत आहे. तो चेहरा आहे, अभिनेता प्रभास याचा. काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'साहो' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेव्हापासून प्रभासच्या या चित्रपटाचाच सर्वत्र गाजावाजा आहे. 

श्रद्धा कपूर आणि प्रभास यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून काही अफलातून अशी साहदृश्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपट म्हटलं की तो सर्व परिंनी कशा प्रकारे परिपूर्णपणे साकारता येईल यावरच निर्माते आणि दिग्दर्शकांचा भर असतो. मग ते कालाकारांची निवड करणं असो किंवा त्या कलाकारांकडून असामान्य अशी कलाकृती घडवून घेणं असो. यातच समावेश असतो तो म्हणजे पार्श्वसंगीताचा. 

साहसी दृश्यांचा भरणा असणारा एखादा चित्रपट म्हटल्यावर त्यात पार्श्वसंगीतही त्याच ताकदीचं असावं लागणार. साहोच्या बाबतीतही हेच निकष होते. ज्यांच्या धर्तीवर कोट्यवधींच्या निर्मिती खर्चात साकारलेल्या या चित्रपटाचं पार्श्वसंगीतही तितकंच धमाकेदार असल्याचं प्रतित होत आहे. चित्रपटाच्या मूळ पार्श्वसंगीतासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असणाऱ्या मोहम्मद घिरबन यांनी बरीच मेहनत घेतली असून, चित्रपट अधिक प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. 

आतापर्यंत घिरबन यांनी अनेकदा संगीत संयोजन करत प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. शिवाय 'साहो'च्या टीझरमधुनही याची एक झलक आपल्या कानांवर येत आहे. त्यामुळे असंख्य व्ह्यूज मिळणाऱ्या चित्रपटाच्या टीझरच्या यशात या पार्श्वसंगीताचीही मोलाची भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही.