बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुप्रिया पाठारेंची सुटका; ३ महिने केलेलं अभिनेत्रीला किडनॅप

आपल्या अभिनयाच्या जोरावर सुप्रिया पाठारेने स्वत:चं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे

Updated: Apr 14, 2024, 07:26 PM IST
बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुप्रिया पाठारेंची सुटका; ३ महिने केलेलं अभिनेत्रीला किडनॅप title=

मुंबई : अभिनेत्री सुप्रिया पाठारे ही मराठी सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्रीपैकी एक आहे. जिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:चं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत. फु बाई फू या शोमधून अभिनेत्री घरा-घरात पोहचली. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत तिने माईची भूमिका साकारली होती.  तिच्या अभिनय कौशल्याचं कायमच प्रेक्षकांकडून कौतुकही होतं. सध्या सुप्रियाची एक मुलाखत प्रचंड व्हायरल होतेय. काही दिवसांपुर्वी सुप्रियाने लोकमतला मुलाखत दिली. यावेळी बोलताना सुप्रियाने धक्कादायक खुलासा केला आहे.

दिलेल्या मुलाखतीत  सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं की, ''१९९५ मध्ये एक निर्माता चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं. शूटिंगसाठी मी इथून एकटी गेली होती. हे तीन महिने बंदुकीची भिती दाखवून माझ्याकडून त्याने अभिनय करवून घेतला. त्याने मला कुटुंबियांशी फोनवरून बोलण्याची परवानगी दिली होती. पण, मराठीत बोलण्यास बंदी घातली होती. 

मात्र मी कशाप्रकारे तरी गुप्त भाषेचा प्रयोग करून माझ्या बहिणीला माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं.मग माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मदत मागितली. यानंतर राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. एक दिवस राजस्थान पोलिसांतील शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातलं होतं. २० तासांचा प्रवास करुन मी सुखरूप सुरतला पोहोचले. याकरिता मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन.''

सुप्रियाचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. सुप्रिया पाठारे याआधी जागो मोहन प्यारे, होणार सून मी या घरची, फू बाई फू, पिंजरा, मोलकरीणबाई यांसारख्या मालिकेत दिसली होती. काही दिवसांपुर्वीच सुप्रिया पाठारे यांनी त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. सुप्रिया पाठारे या मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाचे सदैव कौतुक होताना दिसतं. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे आणि सुप्रियाचं याचेही स्वत:चं 'महाराज हॉटेल' आहे.