Khatron Ke Khiladi 14 मध्ये सहभागी होणार 'हे' कलाकार, संभाव्य यादी समोर

या कार्यक्रमाच्या शूटींगला मे महिन्यापासून सुरुवात होणार आहे. सध्या या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार झळकणार याची चर्चा रंगली आहे. 

Updated: Apr 14, 2024, 07:07 PM IST
Khatron Ke Khiladi 14 मध्ये सहभागी होणार 'हे' कलाकार, संभाव्य यादी समोर title=

Khatron Ke Khiladi 14 Contestant List : रोहित शेट्टीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 14) हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. थरारक स्टंट्स आणि साहसी खेळामुळे या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. या कार्यक्रम हा लहान मुलांसह तरुणामध्येही लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे 14 वे पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटींगला मे महिन्यापासून सुरुवात होणार आहे. सध्या या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार झळकणार याची चर्चा रंगली आहे. 

'बिग बॉस 17' मधील कलाकार झळकणार कार्यक्रमात

'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाचे 14 वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच या कार्यक्रमात झळकणाऱ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. पिंकविला या वेबसाईटने कलाकारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यानुसार यंदा 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात 'बिग बॉस 17' या कार्यक्रमातील कलाकार स्पर्धक म्हणून झळकणार असल्याचे बोललं जात आहे.

कलाकारंची संभाव्य यादी

यात अभिषेक कुमार, मनारा चोप्रा, निमरित कौर अहलूवालिया, मनीषा राणी, एल्विश यादव, अंकिता लोखंडे, नील भट्ट, मनस्वी ममगई, जिया शंकर, शोएब इब्राहिम, विवेक दहिया, शिल्पा शिंदे, फिरोजा खान उर्फ खानजादी आणि हेली शाह हे कलाकर झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण ही संभाव्य यादी असल्याचे बोललं जात आहे. अद्याप याची अधिकृत यादी समोर आलेली नाही. 

आणखी वाचा : '...म्हणून सलमान खानच्या घरावर हल्ला झाला', वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान 'खतरों के खिलाडी' 14 व्या पर्वाची सध्या चर्चा सुरु आहे. पण आतापर्यंत या पर्वाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या कार्यक्रमाचे शूटींग मे किंवा जूनमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे अनेक पर्वाचे शूटींग केपटाऊनमध्ये झाले होते. पण यंदा या कार्यक्रमाचे निर्माते शूटींगसाठी नवीन जागेचा शोध घेत आहेत. यात थायलंड किंवा जॉर्जिया या ठिकाणांची चर्चा आहे. पण याबद्दलही कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.