विराट नाही तर आशिक मुलानं उडवली अनुष्काची झोप

सध्या सोशल मीडियावर एकच आवाज ऐकू येत आहे आणि तो आहे छत्तीसगडच्या सहदेवचा.

Updated: Jul 29, 2021, 05:26 PM IST
विराट नाही तर आशिक मुलानं उडवली अनुष्काची झोप

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एकच आवाज ऐकू येत आहे आणि तो आहे छत्तीसगडच्या सहदेवचा. तुम्ही 'जाने मेरी जानेजा, बसपन का प्यार कही भूल नहीं जाना रे' हे गाणे ऐकलं असेलच. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सहदेवचं हे गाणं आणि गाण्याची स्टाईल तुफान व्हायरल होत आहे. युजर्सपासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत या गाण्याचं वेड सगळ्यांनाच लागलं आहे. त्याचवेळी अनुष्का शर्माने तिच्या गाण्याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामुळे अनुष्काची ही पोस्ट देखील चर्चेत आहे. 

लोकप्रिय होतंय सहदेवचं गाणं
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यावर हे लिहिलं आहे की. "मी झोपायचा प्रयत्न करत आहे. पण झोपू शकत नाही." मला असं म्हणायचं आहे की, 'बसपन का प्यार' हे गाणं माझ्या कानात इतकं गुंफत आहे की, जेव्हा मी झोपायची तयारी करते. तरीही हे गाणं माझ्या कानात वाजत असतं. कदाचित म्हणूनच तिने आपल्या स्टोरीवर हा मिम शेअर केला आहे.

अनुंष्काचं वर्कफ्रंट
अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत वेळ घालवल्यानंतर इंग्लंडला आली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सुंदर फोटोही शेअर केले आहेत. अनुष्का आणि विराटच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. अनुष्काच्या वर्कफ्रंटविषयी बोलायंच झालं तर, ती कतरिना कैफसोबत 'झिरो' चित्रपटात दिसणार आहे. याचबरोबर तिने आपल्या प्रोडक्शन बॅनरखाली 'बुलबुल' आणि 'पाताल लोक' चित्रपट प्रदर्शित केले. अनुष्का आई झाल्यानंतर मुलगी वामिकाची एक झलक पाहण्यास चाहते खूप उत्सुक आहेत.