close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अक्षयच्या आधी 'या' अभिनेत्यांनी साकारली ट्रान्सजेंडरची भूमिका

 बॉलिवूड कलाकार विशिष्ट भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.

Updated: Oct 9, 2019, 06:40 PM IST
अक्षयच्या आधी 'या' अभिनेत्यांनी साकारली ट्रान्सजेंडरची भूमिका

मुंबई : बॉलिवूड कलाकार विशिष्ट भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक चित्रपटात वेगळ्या थाटणीच्या भूकांमध्ये दिसतो. सध्या तो 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा तमिळ सिनेमा 'कंचना'चा रिमेक आहे.

अक्षयच्या आधी अनेक अभिनेत्यांनी चित्रपटासाठी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. 

आशुतोष राणा 
आशुतोष राणा यांनी 'संघर्ष' चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव 'लज्जा शंकर पांडे' असं होतं. जो मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या करत असे. 

सदाशिव अमरापुरकर
सदाशिव अमरापुरकर यांची 'महाराणी' ही भूमिका आजही चाहत्यांच्या मनात आहे. या भूमिकेसाठी त्यांने अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. 

महेश मांजरेकर 
अभिनेत्री कंगणा रानौत आणि पारस अरोराच्या 'रज्जो' चित्रपटात महेश ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेसेठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. 

परेश रावल 
१९९७ साली आलेल्या 'तमन्ना' चित्रपटात त्यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पूजा भट्ट, शरद कपूर आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत झळकले होते. 

'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा तमिळ सिनेमा 'कंचना'चा रिमेक आहे. या सिनेमात अक्षय कुमार लीड रोल करत असून कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. अशी देखील चर्चा आहे की, अमिताभ बच्चन देखील या सिनेमात ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारणार आहे.