मिसवर्ल्ड होण्याआधी Aishwarya Rai चा रॅम्प वॉक व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Updated: Feb 12, 2022, 04:26 PM IST
मिसवर्ल्ड होण्याआधी Aishwarya Rai चा रॅम्प वॉक व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे या अभिनेत्रीचा जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीतही तिच्या नावाचा समावेश झाला आहे. ऐश्वर्या रायची एक  झलक पाहण्यासाठी लाखो लोकं आतूर असतात. मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्याने अनेक कार्यक्रमांसाठी रॅम्प वॉकही केला आहे. अशा परिस्थितीत ऐश्वर्या रायचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या चर्चेत आहे.

हा व्हिडिओ ऐश्वर्या रायच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देण्यात आलं होतं की, अभिनेत्री मिस वर्ल्ड होण्यापूर्वी हे सर्व रॅम्प वॉक केले होते. व्हिडिओमध्ये तुम्ही ऐश्वर्या एकामागून एक अनेक आउटफिट्समध्ये रॅम्पवर स्टायलिश वॉक करताना पाहू शकता. ऐश्वर्या प्रत्येक आउटफिटमध्ये धुमाकूळ घालत आहे. असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ऐश्वर्याचं लग्न अभिषेक बच्चनशी झालं आहे. ज्यांच्यासोबत तिला आराध्या बच्चन नावाची एक लाडकी मुलगी आहे. आराध्यानंतर ऐश्वर्या चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नाही. ती शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात दिसली होती.