'जवान'च्या रिलीजआधीच शाहरुखने मानले नाशिककरांचे आभार! कारण...

Jawan Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सगळ्यात शाहरुखनं नाशिककरांचे आभार मानले आहे. त्यानं असं का केलं याशिवाय जाणून घेणार होतो. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 5, 2023, 10:59 AM IST
'जवान'च्या रिलीजआधीच शाहरुखने मानले नाशिककरांचे आभार! कारण...
(Photo Credit : Social Media)

Jawan Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सध्या त्याच्या 'जवान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या निमित्तानं शाहरुख अनेक ठिकाणी स्पॉट झाला. त्याच्या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरु झाली आहे. अशात आता अनेक चाहते जे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर शाहरुख अनेक चाहत्यांशी संपर्क साधताना दिसतो. अशात सोशल मीडियावर शाहरुखनं नाशिक करांचे आभार मानले आहे. त्यानं असं का केलं या गोष्टींचा विचार अनेकांना पडला आहे. 

शाहरुख खाननं त्याच्या एक्स अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) नाशिककरांचे आभार मानले आहेत. त्यानं असं का केलं त्याविषयी जाणून घेऊया... सध्या जगभरातील त्याच्या चाहत्यांनी 'जवान' चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर त्याचे फॅन क्लब आहेत. या फॅन क्लबकडून ग्रुप बुकिंग करण्यात येत आहे. त्याच्या नाशिकमधल्या एका फॅन क्लबनं असचं ग्रुपसाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं आणि त्याचा स्क्रिन शॉट शेअर करत शाहरुखला टॅग केलं. शाहरुखनंही चाहत्यांचं प्रेम पाहून नाशिककरांचे आभार असल्याचे म्हटले आहे. शाहरुखनं केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

तीन दिवसांपूर्वी 'जवान'च्या आगाऊ बूकिंगची सुरुवात झाली आहे. तीन दिवसातच भारतातील अनेक थिएटर्समध्ये 70 टक्के शोचं बूकिंग झालं आहे. रविवारी रात्री 'जवान'ची 5.77 लाख पेक्षा जास्त तिकिटांची आगाऊ बूकिंग झाली होती. त्यात आता अजूनही दोन दिवस बाकी असताना या चित्रपटाच्या किती तिकिटांची बूकिंग होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जर शाहरुखचा 'जवान' ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अशीच असेल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत जाणार आहे.  

हेही वाचा : 'तुझ्या पोराला ड्रग्स प्रकरणात अडकवून...', किरण मानेनीं पोस्ट करत केलं शाहरुखच्या 'जवान'च प्रमोशन!

दरम्यान, शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x