लग्नाच्या २ दिवस आधी अंकिता लोखंडे रुग्णालयात दाखल

लग्नाच्या तोंडावर अंकिता लोखंडेचा मोठा अपघात

Updated: Dec 8, 2021, 05:18 PM IST
लग्नाच्या २ दिवस आधी अंकिता लोखंडे रुग्णालयात दाखल

मुंबई : अंकिता लोखंडे आणि विकी जैन त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, अंकिताचा अपघात झाला असून, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पायाला दुखापत झाल्याने अंकिताला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका वृत्तानुसार, “अंकिताचा पाय मुरगळला आहे.आणि तिला तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र आता तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे पण डॉक्टरांनी त्याला बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. विकी जैन आणि अंकिता लोखंडेचा विवाहसोहळा 12ते14 डिसेंबरला पार पडणाक आहे.

अंकिता लोखंडे हिच्या पायाला दुखापत होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या बातमीनंतर चाहते त्यांच्या लग्नाबाबत अंदाज लावत आहेत. डॉक्टरांनी तिला पूर्ण बेडरेस्ट घेण्यास सांगितला आहे. अशा परिस्थितीत अंकिता तिच्या लग्नाची तयारी योग्य पद्धतीने करू शकणार नाही. लग्नापर्यंत अंकिता पूर्णपणे बरी होईल की नाही, अशी भीती चाहत्यांच्या मनात आहे. मात्र आता हे येत्या काळात कळेलच.

यापूर्वी अंकिता लोखंडेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या प्री वेडिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूपच क्यूट आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी जैन दोघंही मुंडावळ्या बांधताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंदी दिसत आहेत.

अंकिता आणि विकी या दोघांच्याही डोक्यावर मुंडावार बांधलेले दिसत आहे. दोघांचे लग्नाआधीचे सोहळे मराठी रितीरिवाजानुसार पार पडत आहेत. हा व्हिडिओ 52 सेकंदांचा आहे. अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.