भाषा समजली नाही तरी हा VIDEO तुम्ही पूर्ण पहालच

असं म्हणतात की, संगीत आणि अभिनयाची कुठलीच भाषा नसते. जर भाव, स्वर आणि संवेदना ह्रदयस्पर्शी असतील तर कला थेट मनाला स्पर्श करते. मग हे संगीत कुठल्याही भाषेतील असो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Sunil Desale Updated: Mar 29, 2018, 08:40 PM IST
भाषा समजली नाही तरी हा VIDEO तुम्ही पूर्ण पहालच title=
Image: @Badal Mondal/Youtube

नवी दिल्ली : असं म्हणतात की, संगीत आणि अभिनयाची कुठलीच भाषा नसते. जर भाव, स्वर आणि संवेदना ह्रदयस्पर्शी असतील तर कला थेट मनाला स्पर्श करते. मग हे संगीत कुठल्याही भाषेतील असो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. हा व्हिडिओ फेसबूक पोस्टच्या माध्यमातूनही शेअर केला जात आहे.

व्हिडिओची खास बाब म्हणजे...

एका महिलेने बंगाली भाषेत कविता गात असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. खास बाब म्हणजे ही कविता बंगाली भाषेत आहे आणि ही भाषा न समजणारे लोकही हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

सर्वात खास बाब म्हणजे व्हिडिओत दिसणाऱ्या गायिकेने एक कविता खूपच खास अंदाजात ऐकवली आहे. त्यामुळे सर्वचजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

कोण आहे गायिका?

व्हिडिओत दिसणारी गायिका आणि कविता बोलणाऱ्या महिलेचं नाव बृतति बंधोपाध्याय असं आहे. बृतति या बंगालमधील प्रसिद्ध कविता पठन करणाऱ्या गायिका आहेत. प्रभावी भाषा आणि योग्य उच्चार करणं बृतति शिकवतात.

बृतति यांनी भारत आणि जगभरात आतापर्यंत २००० हून अधिक कवितांचं गायन केलं आहे. रविंद्रनाथ टागोर, सुकुमार रॉय, शंखा घोष यांच्या सारख्या प्रसिद्ध बंगाली कविंच्या अनेक कवितांचं गायन बृतति यांनी केलं आहे.