Election results 2019 :पाहा बॉलीवूडमधून नरेंद्र मोदींना कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

लोकशाहीच्या उत्सवाचे औचित्य साधत दिग्गजांनी  पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.  

Updated: May 23, 2019, 05:19 PM IST
Election results 2019 :पाहा बॉलीवूडमधून नरेंद्र मोदींना कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. लोकशाहीच्या उत्सवात भाजपा समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देशात दुसऱ्यांदा मोदी करिश्मा कायम आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अंदाजानुसार दुपारी ३ वाजेपर्यंत भाजप ३०० जागांवर आघाडीवर आहे. याचदरम्यान भाजपा समर्थकांचा जल्लोष देशासह परदेशातही कायम आहे. काही मतदार संघातील निकाल जाहीर झाले आहेत, तर काही ठिकाणी कोणता उमेदवार बाजी मारेल यावर अंदाज वर्तवले जात आहेत. 

भाजपा आघाडीवर असल्याचे चित्र समोर आहे. या लोकशाहीच्या उत्सवात बॉलिवूड कलाकारही सहभागी झाले आहेत. भाजपाची आघाडी पाहाता बॉलिवूडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची सुरूवात केली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार रजनीकांत, अजय देवगण, अनुपम खेर यांच्या शिवाय अनेक दिग्गज कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.