Bhabiji Ghar Par Hai मालिकेतील अभिनेत्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

त्याने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Updated: Oct 21, 2021, 08:04 PM IST
Bhabiji Ghar Par Hai मालिकेतील अभिनेत्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई : टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय शो "भाभीजी घर पर हैं" मध्ये विभूती नारायण मिश्राची भूमिका साकारणाऱ्या आसिफ शेखने टीव्हीच्या जगात एक इतिहास रचला आहे.

आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेता आसिफला या शोमध्ये सुमारे 300 वेगवेगळ्या भूमिका साकरण्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डची पदवी देण्यात आली आहे. त्याने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांसोबत सेलेब्सही त्याच्या पोस्टवर त्याचे अभिनंदन करत आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिले - धन्यवाद मित्रांनो हे केल्याबद्दल. भाभीजी घर पर है मध्ये 300 वेगवेगळी पात्रे पार केली. आसिफ गेल्या 6 वर्षांपासून या शोशी जोडला गेला आहे आणि कॉमेडीने लोकांना हसवत आहे.