शेहनाजच्या हातातील चुड्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष....सिद्धार्थच्या निधनानंतर तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने शहनाज गिल एकटी पडली आहे 

Updated: Oct 21, 2021, 08:38 PM IST
 शेहनाजच्या हातातील चुड्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष....सिद्धार्थच्या निधनानंतर तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने शहनाज गिल एकटी पडली आहे आणि तिच्या चाहत्यांना हे चांगलं ठाऊक आहे. कदाचित हेच कारण आहे की, सिडनाजचं चाहते त्यांना सतत पोस्टद्वारे मजबूत राहण्याचा सल्ला देत आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज आणि त्याचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मात्र शहनाज गिलचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती सूट आणि हातात लाल चूडा घातलेली दिसत आहे.

हा व्हिडिओ सिद्धार्थ आणि शहनाजच्या फॅनक्लब 'I am Sidnaz' सोबत शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, शहनाजने हलका सोनेरी रंगाचा सूट घातला आहे आणि तिने तिच्या हातात लाल बांगड्याही घातल्या आहेत. या व्हिडिओमध्ये शहनाज नवीन नवरीसारखी दिसत आहे. शहनाजच्या या व्हिडिओवर युजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बरेच लोक भावनिक देखील दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्टवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजर्सने लिहिलं, 'कदाचित तुला असं सिद्धार्थसोबत पाहू शकलो असतो'. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'शहनाज लाखात एक आहे'. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, अलीकडेच शहनाज गिलचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो फक्त 40 वर्षांचा होता. सिद्धार्थच्या दुःखामुळे शहनाज महिनाभर घराबाहेरही पडली नाही. अलीकडेच, शहनाजचा 'होंसला रख' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यात ती दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा त्याच्यासोबत दिसली आहे.