'भाभीजी घर पै है' फेम अभिनेत्याचे निधन, हार्ट अटॅकने घेतला जीव

firoz khan Died:टीव्ही क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येतेय.

Updated: May 23, 2024, 04:06 PM IST
'भाभीजी घर पै है' फेम अभिनेत्याचे निधन, हार्ट अटॅकने घेतला जीव title=
firoz khan Died

firoz khan Died: टीव्ही क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येतेय. भाभीजी घर पै हे मालिकेतील अभिनेता फिरोज खान यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री आणि अभिनयामुळे त्यांची विशेष ओळख होती. 23 मेच्या सकाळी बदायू येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट होतेय. यामुळे लोकं त्यांना फिरोज खान अमिताभ डुप्लीकेट नावाने हाक मारायचे. टीव्ही अभिनेत्याच्या मृत्यूमुळे त्यांचे चाहते, टीव्ही इंडस्ट्री  आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. 

अभिनेता फिरोज खान यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर सिने क्षेत्रातही आपली ओळख बनवली होती. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट बनून त्यांनी काही सिनेमांमध्ये काम केले. 23 मे रोजी उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

अमिताभ यांचे डुप्लीकेट फिरोज खान यांनी अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय. भाभीजी घर पे है, जीजी जी छत पर है, साहब बीबी और बॉस, हप्पू की उल्टन पल्टन आणि शक्तिमान या मालिकेत त्यांनी काम केलंय. गायक अदनान सामी यांच्या थोडी सी तो लिफ्ट करा दे मध्ये ते झळकले होतेय. काही दिवसांपासून ते यूपीच्या बदायू येथे इव्हेंट्सच्या कामासाठी आले होते.. 

फिरोज खान यांनी 4 मेला बदायू क्लबमध्ये मतदाता महोत्सवात आपला शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. जो लोकांना खूप आवडला. फिरोज खान सोशल मीडियात खूप अॅक्टीव्ह असायचे. त्यांनी अमिताभ याच्यासहित दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्यासह अनेक सिने कलाकारांची मिमिक्री केली.