भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू 'या' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा आहे.

Updated: Aug 25, 2018, 01:36 PM IST
भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू 'या' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा आहे. याची सुरुवात श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरच्या धडक सिनेमापासून सुरु झाली. त्यानंतर आता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करतील. याशिवाय 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. सध्या अभिमन्यु सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जान्हवी कपूरनंतर हे ५ स्टार किड्स बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज!

 

याबद्दल तो म्हणाला की...

प्रमोशनदरम्यान मीडियाशी बोलताना त्याने सांगितले की, मी जेव्हा आईसोबत असतो तेव्हा लोकं मला ओळखतात. सिनेसृष्टीत माझे कोणी फ्रेंड्स नाहीयेत. मी कधी सिनेमांच्या पार्ट्यांनाही जात नाही. माझ्या संस्कारांनी मला एक चांगला माणूस बनण्याची शिकवण दिली आहे.

हा प्रोजेक्ट त्याला कसा मिळाला, हे देखील अभिमन्युने सांगितले. तो म्हणाला की, कोणीतरी मला ऑडिशनचा स्क्रीन शॉट पाठवला होता. ज्यात त्यांना मार्शल आर्ट सिनेमासाठी एक हिरो हवा होता. तेथे मी ऑडिशन दिले. ऑडिशन ३० मिनिटे चालले. सिलेक्शन होण्याची फार आशा मला नव्हती. मी यापूर्वी सुमारे २०-३० ऑडिशन्स दिले होते. 

सुरुवातील बिजनेस करण्याची इच्छा असलेल्या अभिमन्युला कालांतराने अभिनय आणि फिल्म मेकिंगमध्ये रस निर्माण झाला.