भारती सिंगला हवा घालणारा 'तो' माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?

Bharti Singh : भारती सिंगला माधुरी दीक्षितचा मुला घालत होता हवा, कळताच भारतीनं बसला धक्का... भारतीनं केला खुलासा..

दिक्षा पाटील | Updated: Feb 22, 2024, 04:14 PM IST
भारती सिंगला हवा घालणारा 'तो' माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?  title=
(Photo Credit : Social Media)

Bharti Singh : रिअॅलिटी शो 'डान्स दीवाने' ची परिक्षक म्हणून माधुरी दीक्षित शोमध्ये एकदा पुन्हा परतल्या आहेत. या शोचं सुत्रसंचालन भारती सिंगनं करते, तर तिनं आता माधुरी दीक्षित यांच्या मुलाविषयी असलेला एक किस्सा सांगितला आहे. करण जोहरच्या चित्रपटात माधुरीचा मुलगा अरिन आणि मलायका अरबजचा मुलगा अरहान असिस्टंट म्हणून काम करत होते. या चित्रपटात भारतीची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. त्यादरम्यान, सेटवर स्टार किड्सला काम करताना पाहिलं आणि ते पाहून तिला आश्चर्य झाले. ते पाहिल्यानंतर भारतीला एक विचार आला की ती देखील तिच्या मुलाला मोठं होऊन अशीच शिकवण होईल. 

भारतीनं सांगितलं की 'मी करण जोहरसोबत एक चित्रपट करत होते आणि तिथे तुमचा मुलगा (माधुरी) तिथे तो असिस्ट करत होता. सीन कट झाल्यानंतर करण सरांनी त्यांना सांगितलं की जाऊन खुर्ची घेऊन ये. मी आणि हर्ष तिथेच बसलो होतो. दोघं मुलं आम्हाला पंखा करू लागले तेव्हा ते म्हणाले की भारती, तू याला कधी भेटली आहेस? हा माधुरी मॅमचा मुलगा आहे. मी लगेच त्याच्या हातातून पंखा खेचून घेतला आणि त्यानंतर त्यालाच पंखा करु लागले. तर दुसरीकडे अरबाज सर यांचा मुलगा अरहान देखील होता.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारतीनं पुढे सांगितलं की "हा सुपरस्टारचा मुलगा आहे. याला हवं असतं तर त्यानं वरून कामाची सुरुवात केली असती. मी स्वत: पाहिलं की ते अशी काम करत आहेत. जशी एकदम सुरुवात असते. त्यावेळी त्यांना पाहून मला फार आनंद झाला होता आणि मी विचार करु लागले की तुम्ही किती चांगले पालक आहेत आणि मी त्या दिवशी देखील मी काहीतरी शिकले." भारतीनं हे देखील सांगितलं की "मी माझ्या मुलांना शिकवणारी की बेटा A पासून सुरुवात करायची आणि मग Z पर्यंत जायचं. सरळ Z पासून सुरुवात करायची नाही."

हेही वाचा : पॉडकास्टमध्ये आजी जया बच्चनसोबत एकत्रित आले अगस्त्य, नव्या; लोकांनी केली ऐश्वर्याला पाहण्याची मागणी

माधुरीला दोन मुलं आहेत एक अरिन आणि रयान. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहांणी' या चित्रपटासाठी अरिननं असिस्टंट म्हणून काम केले होते. शूटिंग दरम्यान, त्या सगळ्या स्टारकिड्सनं एकत्र असा फोटो काढला होता. या फोटोत अरिन, अरहान आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान देखील पोज देताना दिसला. या चित्रपटात रणवीर सिंगनं आलिया भट्टसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x