एकीकडे MMS लीक, दुसरीकडे अभिनेत्रीला मारहाण?

अभिनेत्री पाखी हेगडे बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिली, पण जेव्हा तिने पुन्हा कमबॅक केला, तेव्हा ती धमाकेदार अंदाजात परतली.

Updated: Aug 21, 2021, 08:41 AM IST
एकीकडे MMS लीक, दुसरीकडे अभिनेत्रीला मारहाण? title=

मुंबई : अभिनेत्री पाखी हेगडे बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिली, पण जेव्हा तिने पुन्हा कमबॅक केला, तेव्हा ती धमाकेदार अंदाजात परतली. तिने येताच, अनेक हिट गाणी देऊन, पाखीने दाखवून दिले की, ती आधी प्रमाणेच जबरदस्त आहे. इंडस्ट्रीपासून बऱ्याच वर्षांच्या अंतरानंतर, पाखीला खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav)  यांच्या 'बँग्लनिया' या गाण्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली.

यानंतर तिचे अनेक व्हिडिओ गाणी इंडस्ट्रीमध्ये गाजली. तिच्याकडे भोजपुरीसह साऊथचे काही प्रोजेक्ट आहेत. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत राहते. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचे कपडे आणि तोंड रक्ताने माखलेले दिसत आहे.

वास्तविक हा व्हिडिओ तिच्या साऊथ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा आहे. हा व्हिडिओ पाखीने नुकताच पोस्ट केला होता, जो आता व्हायरल होत आहे. 50 हजारांहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे आणि अनेक प्रकारच्या कमेंट्स देखील करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pakkhi Hegde (@pakkhihegde)

व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच अभिनेत्रीने एक कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, 'शूटिंगच्या वेळी व्हिडिओ, चित्रपटाच्या सेटवरून' ... व्हिडिओमध्ये तिने पांढरा ड्रेस घातला आहे. संपूर्ण चेहऱ्यावर रक्त लागल्याचं दिसत आहे. चित्रपटासाठी हा मेकअप करण्यात आला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.