मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी 'भूल भुलैया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत, कियारा आणि कार्तिक कधी रिअॅलिटी शोमध्ये दिसतात. तर कधी ते लोकांमध्ये प्रमोशन करताना दिसतात.
आता अलीकडेच कार्तिक आणि कियारा या चित्रपटासाठी प्रेस कॉन्फर्न्समध्ये दिसले. दरम्यान, मीडिया संवादादरम्यान, कियाराच्या तोंडून असं काहीतरी बाहेर पडलं, हे ऐकून कार्तिकही लाजला आणि त्याला आपलं हसू आवरता आलं नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कियारा मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहे.
कार्तिक आर्यन लाजला..
कियाराने सांगितलं की, जेव्हाही हवेलीवर शूटिंग केलं जातं तेव्हा अनेकदा त्याच्याशी काही ना काही कथा जोडलेली असते. अशा परिस्थितीत त्याचा फायदा घ्यायचाच होता. त्याचबरोबर कॅमेरा कार्तिकच्या दिशेने जातो. हे ऐकताच कार्तिक लाजून लाल होतो. या प्रश्नाचं उत्तर देणं कार्तिकसाठी सोपं नव्हतं. दुसरीकडे, कियाराला लवकरच समजतं की, तिच्या तोंडातून काहीतरी चूकन बाहेर पडलं आहे. या नंतर ती कार्तिकला ते तीन शब्द म्हणते की, i am sorry... आणि तिची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. आणि कार्तिकही तिला चूक सुधारण्यासाठी सांगतो
सध्या हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या जोरात आहेत. दोघांनीही याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. या संपूर्ण प्रकरणावर या दोघांनी मौन बाळगलं आहे.
सध्या कियारा तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करत असून, ती कार्तिकसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन ही जोडी पहिल्यांदाच भूल भुलैया २ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मात्र, दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 20 मे रोजी रिलीज होणार आहे.