या दिवाळीत... दरवाजा उघडणार, कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' चा पोस्टर, लूकची जोरदार चर्चा

Bhool Bhulaiyaa 3 First look: कार्तिक आर्यनने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चे पहिले पोस्टर शेअर केले आहे.  

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 25, 2024, 03:08 PM IST
या दिवाळीत... दरवाजा उघडणार, कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' चा पोस्टर, लूकची जोरदार चर्चा title=

Bhool Bhulaiyaa 3 First look: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आता त्याची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप कलाकारांमध्ये केली जात आहे. कार्तिक आर्यनच्या अभिनयाने सोशल मीडियावर चाहत्यांना वेड लावलं आहे. 

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन हा 'चंदू चँपियन' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहिजे तितके यश मिळवू शकला नाही. पण चित्रपटातील कार्तिकचे काम आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' या चित्रपटाची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी कार्तिक आर्यनने या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

कार्तिक आर्यनने शेअर केला चित्रपटाचा पोस्टर 

सध्या कार्तिकचे चाहते त्याच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला होता. यानंतर आता त्याच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या नवीन पोस्टरची झलक शेअर केली आहे. 

कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक मोठा दरवाजा दिसत असून त्याला लॉक लावले आहे. यासोबत अभिनेत्याने एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. त्याने म्हटलं आहे की, या दिवाळीत दार उघडेल, 'भूल भुलैया 3'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चाहत्यांकडून पोस्टवर होतोय कमेंट्सचा वर्षाव 

कार्तिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांनी बाबा लवकर येणार आहे. ट्रेलरची वाट पाहत आहे. तर काही चाहत्यांनी आता थांबू शकत नाही अशा कमेंट केल्या आहेत. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं आहे की, शेवटी तुम्ही पोस्ट केले. आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. 

या दिवशी प्रदर्शित होणार 'भूल भुलैया 3'

अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. हा चित्रपट अभिनेता अजय देवगनच्या 'सिंघम 3' ला टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी आणि विद्या बालन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे.