वयाच्या 43 व्या वर्षी 'जब वी मेट'मधील अभिनेत्याला केस येईनात; Instagram ला पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या वेदना

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) सध्या आपल्या केसांमुळे त्रस्त आहे. विश्वास बसत नसेल तर त्यानेच शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट पाहा...  

शिवराज यादव | Updated: Sep 25, 2024, 03:01 PM IST
वयाच्या 43 व्या वर्षी 'जब वी मेट'मधील अभिनेत्याला केस येईनात; Instagram ला पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या वेदना  title=

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) सध्या 'देवा'च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. यानिमित्ताने शाहीद कपूर ठिकठिकाणी देवाच्या लूकमध्ये दिसत आहे. यादरम्यान शाहीद कपूरने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत केसांसंबंधी चिंता जाहीर केली आहे. पोस्टमध्ये शाहीद कपूर कारच्या मागच्या सीटवर बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ये केस येत का नाहीत....देवा रे देवा'. बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आगामी चित्रपट 'देवा'मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहीद कपूरसह पूजा हेगडे आणि पावेल गुलाटीदेखील आहे. 

रोशन एंड्र्यूज देवा चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तसंच सिद्धार्थ रॉय कपूरच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जात आहे. देवा चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला रिलीज होणार आहे.  

अलीकडेच शाहिद “जी करदा” वर डान्स करताना दिसला होता. शाहिदने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो 2008 च्या ॲक्शन कॉमेडी चित्रपट “सिंग इज किंग” च्या गाण्यावर भांगडा सादर करताना दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, ओम पुरी, रणवीर शौरी, नेहा धुपिया, जावेद जाफरी, सोनू सूद आणि सुधांशू पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या व्हिडीओच्याा कॅप्शनमध्ये शाहीदने लिहिलं आहे की, 'जब जी करदा तो मैं करदा, भांगड़ा'.

शाहीदच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं गेल्यास 2015 मध्ये त्याने मिराशी लग्न केलं. त्यांना मिशा आणि जैन अशी दोन मुलं आहेत.  त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, शाहिदने 2003 मध्ये केन घोष दिग्दर्शित 'इश्क विश्क' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केलं. या चित्रपटात अमृता राव आणि शेनाज ट्रेझरीवाला देखील होत्या. यानंतर त्याने 'फिदा', 'दिल मांगे मोर', '36 चायना टाउन', 'विवाह', 'जब वी मेट', 'किस्मत कनेक्शन', 'कमिने', 'फटा पोस्टर निकला हिरो', 'हैदर' हे चित्रपट केले. 'पद्मावत', 'कबीर सिंह', 'जर्सी' सारख्या चित्रपटातही त्याने काम केलं. तो शेवटची सायन्स फिक्शन रोमँटिक कॉमेडी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' मध्ये दिसला होता.