बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला (Bhumika Chawla) सध्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटात भूमिका ही पूजा हेगडेच्या वहिनीची भूमिका साकारत आहे. एकेकाळी सलमान आणि भूमिकानं 2003 साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात काम केले होते. याच चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर भूमिका बरीच वर्षे अभिनय क्षेत्रापासून लांब होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भूमिकानं अनेक खुलासे केले आहेत.
भूमिकानं आरजे सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं, तेरे नाम चित्रपटानंतर मला अनेक ऑफर्स मिळाल्या. मी खूप विचार करून काम करते, मी चुझी आहे. त्यानंतर मी एक खूप मोठा चित्रपट साइन केला होता पण नंतर चित्रपटाचं प्रोडक्शन बदललं, मग हीरो बदलला, चित्रपटाचं नाव बदललं. मग काय अभिनेत्रीपण बदलण्यात आली. पण जर मी असं केलं असतं तर परिस्थीती वेगळी असती, तर म्हणतात ना जे लिहिलय ते होत. त्यात सुद्धा मी त्या चित्रपटाची एक वर्षे प्रतिक्षा केली आणि दुसरे कोणते चित्रपट साइन केले नाही. त्यानंतर मी आणखी एक चित्रपट साइन केला, जो कधी झालाच नाही. तर जे चित्रपट केले ते इतके चाललेच नाही. हे एका जुगारासारखं आहे. तुम्हाला माहित नसतं कधी आणि कोणता चित्रपट चांगलं काम करेल.
पुढे भूमिका म्हणाली, ‘जब वी मेट’मध्ये सगळ्यात आधी तिला साइन करण्यात आलं होतं. तर चित्रपटात मी आणि बॉबी देओल पहिले होते जेवहा त्याला ट्रेन म्हटलं होत. त्यानंतर मी आणि शाहिद कपूर मग शाहिद आणि आयशा टाकिया आणि अखेर शाहिद आणि करीना कपूर या चित्रपटात दिसले. पुढे तिनं सांगितलं की संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात देखील ती भूमिका साकारणार होती. पण त्या चित्रपटात तिनं भूमिका का साकारली नाही त्यावेळी तिचं कारण सांगितलं नाही.
बाजीराव मस्तानी विषयी बोलताना भूमिका म्हणाली, भन्साळी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट बनवल्यापासून हा चित्रपट बनवण्यास इच्छुक होते. सुरुवातीला त्यांना सलमान आणि शाहरुखसोबत हा चित्रपट करायचा होता, पण ते होऊ शकलं नाही. अशातच सिद्धार्थ कन्ननशी बोलताना भूमिकाने खुलासा केला की, तिलाही या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आलं होतं. तिने या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती पण पुढे काहीच झालं नाही.
भूमिका म्हणाली, 'खूप वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’नंतर लगेचच माझी स्क्रीन टेस्ट झाली. मी भन्साळी सरांबरोबर त्यांच्या स्टाईलमध्ये फोटोशूट केले होते. तिथं असलेल्या तूप आणि तेलामुळे माझ्या साडीला आग लागली. कारण माझ्या हातात दिवे होते, ते माझ्या साडीवर पडले, त्यात मी सिल्कची साडी नेसली होती.”
हेही वाचा : अभिनेत्याच्या पत्नीची कमाल, ब्रेस्ट मिल्क आणि बाळाच्या नाळेपासून बनवला 'हा' दागिना!
भूमिका पुढे इतर चित्रपटांविषयी बोलताना म्हणाली, मला फक्त एकदा वाईट वाटलं आणि मग कधीच नाही. मी याविषयी कधी जास्त विचार केला नाही. मी मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपट साइन केला होता पण ते देखील शक्य झालं नाही. मग मणि रत्न्म सरांसोबत एक चित्रपट साइन केला पण तो सुद्धा झाला नाही. फक्त राजू सर होते ज्यांच्यासोबत मी 10-12 वर्षांनी आम्ही एका ठिकाणी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणच्या चुकीमुळे मला चित्रपट मिळू शकला नाही. पण जाऊ द्या काही नाही इथे पण असचं होतं.