लग्नानंतर अभिनेत्री Hruta Durgele चा मोठा अपघात?

छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरु' या मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळे घराघरात पोहोचली.

Updated: Jun 3, 2022, 07:06 PM IST
लग्नानंतर अभिनेत्री Hruta Durgele चा मोठा अपघात?  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरु' या मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळे घराघरात पोहोचली. हृताने 'फुलपाखरु' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर 'मन उडू उडू झालं' ही मालिका सुद्धा चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसत आहे. 

नुकतीच हृताने प्रतीक शाहसोबत लग्नाठ बांधली. मे महिन्यात या दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. येवढं सगळं छान सुरु असताना हृताचा अपघात झाला आहे असं म्हटलं जातय. होय नुकताच हृताचा खूप मोठा अपघात झाला आहे. आणि हा अपघात खऱ्या आयुष्यात नसून 'मन उडू उडू झालं' या मालिकेत घडला आहे. दिपू आणि इंद्राच्या आयुष्यात आता खूप मोठं वळण आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, दिपू हॉस्पिटलमध्ये आहे. आणि यावेळी तिला ऑक्सिजन लावण्यात आलं आहे. तसच इंद्रा दिपूसाठी देवाकडे प्रार्थना करतो. आणि अग्निपरीक्षा देतो. या अग्नीपरिक्षेत इंद्रा यशस्वी होणार का आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे हा अपघात खऱ्या आयुष्यातला नसून मालिकेतला आहे. झी मराठीवरील या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. हृताचे इन्स्टाग्रामवर 2 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत.