बिग बींना पहिल्या चित्रपटासाठी मिळालं एवढं मानधन

त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला चक्क ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Updated: Nov 7, 2019, 03:48 PM IST
बिग बींना पहिल्या चित्रपटासाठी मिळालं एवढं मानधन title=

मुंबई : एकेकाळी फक्त अमिताभ बच्चन म्हणून ओळख असलेले बिग बी आज संपूर्ण कलाविश्वतील महानायक आहेत. आज त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला चक्क ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या करियरमध्ये वेगळ्या थाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी संपूर्ण जगात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अनेकांच्या प्रेरणास्थानी देखील बिग बी विराजमान आहेत. 

अमिताभ बच्चन यांचा ७ नोव्हेंबर १९६९ साली 'सात हिंदुस्तानी' हा पहिला चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला होता. ७ तारखेला सात हिंदुस्तानी प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 

१९६९ साली सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाने यशाची सर्व उच्च शिखरं आपल्या नावावर केले आहेत. आजही बिग बींची काम करण्याची उत्सुकता कायम आहे. लवकरच ते अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांना भेटणार आहेत. 

प्रत्येक जण आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. 'सात हिंदुस्तानी' चित्रपट हाती लागल्यानंतर त्यांनी पैश्यांना महत्त्व न देता अभिनयाल महत्त्व दिलं. या चित्रपटासाठी त्यांना ५ हजारांचं मानधन मिळालं हेतं. 

हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला होता. परंतु या चित्रपटाने कलाविश्वाला मात्र महानायक दिला.