आईच्या निधनानंतर वडिलांची 4-5 लग्नं, 'वडा-पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितनं भावूक होत पहिल्यांदाच सांगितलं वास्तव

Big Boss OTT 3 Chandrika Dixit: चंद्रिका दीक्षितनं 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये वडा-पाव गर्लचा धक्कादायक खुलासा 

दिक्षा पाटील | Updated: Jul 3, 2024, 01:29 PM IST
आईच्या निधनानंतर वडिलांची 4-5 लग्नं, 'वडा-पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितनं भावूक होत पहिल्यांदाच सांगितलं वास्तव title=
(Photo Credit : Social Media)

Big Boss OTT 3 Chandrika Dixit: 'बिग बॉस ओटीटी' च्या तिसऱ्या सीझनची सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे आणि दुसरा आठवडा सुरु झाला आहे. गेल्या एपिसोडमध्ये रणवीर शौरी मुनीषा आणि चंद्रिकानं तिच्या वडिलांच्या निधनाविषयी सांगितलं. त्यांचा मृत्यू कसा झाला आणि तिला कसं एकटं वाटू लागलं. रणवीरला उत्तर देत चंद्रिकानं तिच्या वडिलांविषयी एक असा खुलासा केला ज्यानं रणवीरला देखील मोठा धक्का बसला. 

'बिग बॉस ओटीटी 3' स्पर्धक चंद्रिका दीक्षित जी वडा पाव गर्ल या नावानं ओळखली जाते. हा खुलासा केला की जेव्हा ती 6 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचं निधन झालं. पुढे तिनं सांगितलं की वडिलांसोबत राहत असताना त्यांनी कधीच तिची काळजी घेतली नाही. मग रणवीरनं तिला विचारलं की तिच्या आई-वडिलांशिवाय कशी मोठी झाली. त्याविषयी बोलताना चंद्रिकानं सांगितलं की तिचे वडील हे कोणत्या ना कोणत्या नातेवाईकाकडे सोडून यायचे आणि त्यानंतर तिच्या आईचं निधन झालं आणि वडील मद्यपान करु लागले. 

त्यानंतर चंद्रिकानं पुढे येऊन सांगितलं की कशा प्रकारे तिच्या वडिलांनी 4-5 वेळा लग्न केलं आणि कधी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली नाही. चंद्रिकाची ही गोष्ट ऐकल्यानंतर रणवीरला आश्चर्य झाले. पण चंद्रिकानं सांगितलं की हेच खरं आहे. चंद्रिकानं पुढे जाऊन याविषयी बोलताना सांगितलं की तिला तिच्या वडिलांचा राग येतो. तिनं आईच्या निधनानंतर कधीच तिच्या वडिलांचे तोंड पाहिले नाही. 

तर शोचा स्पर्धक नॅजीनं चंद्रिकाला विचारलं की अशा परिस्थितीत तिला कोणी सांभाळल? हे सांगण्या आधी चंद्रिका थोडी भावून झाली आणि कधी कोणत्या नातेवाईकांकडे तर कधी कोणत्या नातेवाईकांकडे. अशात नातेवाईक तिला खूप वाईट वागणूक देत होते. ती छोटी मुलगी होती, पण तिच्याकडून स्वयंपाक घरातली सगळी काम करुन घ्यायचे. 

हेही वाचा : दूसऱ्या लग्नासाठी यूट्युबर अरमान मलिकनं बदलला धर्म? पहिल्या पत्नीचा खुलासा

याविषयी सांगत चंद्रिकानं सांगितलं, मला राग येतो त्या माणसाचा, जेव्हा मला गरज होती तेव्हा तो माणूस माझ्यासोबत नव्हता. चंद्रिकानं हे देखील सांगितलं की कसं तिच्या आजीनं अधिकृत पद्धतीनं दत्तक घेतलं आणि मग तिचा सांभाळ केला.  जेव्हा आजीला कळालं की नातेवाईक मला किती वाईट वागणूक देतात. मग तिनं मला दत्तक घेतलं.