RRR चित्रपटासंदर्भात मोठी बातमी समोर, चाहत्यांना धक्का

एसएस राजामौली यांची मेगा बजेट फिल्म RRR तमिल, तेलुगू, कन्नड़ आणि मलयालम तसेच हिंदी भाषेतही रिलिज होणार आहे.

Updated: Jan 3, 2022, 05:52 PM IST
RRR चित्रपटासंदर्भात मोठी बातमी समोर, चाहत्यांना धक्का title=

मुंबई : राज्यातच काय तर संपुर्ण देशात कोराच्या रुग्णांची वाढ होत आहे. ज्यामुळे सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. देशातील काही भागात लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध देखील लावले गेले आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि सिनामा गृह 50 टक्के कॅपॅसिटीने सुरू आहेत. यासगळ्याचा फटका सिनेमागृहात येणाऱ्या चित्रपटांच्या कमाईवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 7 जानेवारीला सिनेमागृहात दाखल होणार RRR या चित्रपटाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

राम चरण आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत तेलगू भाषेतील चित्रपट 7 जानेवारीला सिनेमागृहात दाखल होणार होता. परंतु तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. परंतु अद्यात या चित्रपटाची नवीन रिलिज डेट समोर आलेली नाही.

अधिकृत ट्विटर अकाऊंटवर RRR चित्रपटाच्या  रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "सर्व सहभागी पक्षांचे हित लक्षात घेऊन, आम्हाला आमचा चित्रपट पुढे ढकलणे भाग पडलं आहे. चित्रपटावर दाखवलेल्या प्रेमासाठी आम्ही सर्व चाहते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार #RRRPostopened #RRRMovie आमच्या अथक प्रयत्नांनंतरही काही परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. अनेक भारतीय राज्ये चित्रपटगृहे बंद करत आहेत, आम्हाला तुमचा उत्साह टिकवून ठेवण्यास सांगण्याशिवाय पर्याय उरला नाही. आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीचे वैभव परत आणण्याचे वचन देतो. योग्य वेळी, आम्ही करू," 

एसएस राजामौली यांची मेगा बजेट फिल्म RRR तमिल, तेलुगू, कन्नड़ आणि मलयालम तसेच हिंदी भाषेतही रिलिज होणार आहे.