बिग बॉस ११ : आकाशमुळे हिना आणि शिल्पा हैराण

बिग बॉस ११ चा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे आता केवळ दोन आठवडे उरलेत परंतु,  

Updated: Jan 2, 2018, 05:01 PM IST
बिग बॉस ११ : आकाशमुळे हिना आणि शिल्पा हैराण

मुंबई : बिग बॉस ११ चा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे आता केवळ दोन आठवडे उरलेत परंतु, घरात कमी होत चाललेल्या सदस्यांच्या संख्यमुळे उरलेल्या सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होत आहेत... घरात काम कोण करणार? यावरही वाद आता येऊन पोहचलाय. 

सोमवारी बेघर होण्यासाठी शिल्पा, विकास, हिना आणि लव नॉमिनेट झालेत. तर पुनीष आणि आकाश वाचलेत. यानंतर हिना आणि शिल्पा मात्र आकाशच्या अतरंगी वागण्यामुळे हैराण झाल्यात. 

काही वेळेपूर्वी कलर्सच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात शिल्पा, विकास आणि हिना यांचा आकाशवरून आणि कामावरून चर्चा आणि भांडण झालेलं दिसतंय. 

नेमकं कशावरून झालंय हे भांडण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओच पाहा...