Bigg Boss 15 मधील स्पर्धकांची नाव सलमान खानकडून रिवील, पाहा List

बिग बॉस ओटीटी संपला आहे आणि आता प्रेक्षक बिग बॉस 15 ची वाट पाहत आहेत.

Updated: Sep 24, 2021, 03:52 PM IST
 Bigg Boss 15 मधील स्पर्धकांची नाव सलमान खानकडून रिवील, पाहा List

मुंबई : बिग बॉस ओटीटी संपला आहे आणि आता प्रेक्षक बिग बॉस 15 ची वाट पाहत आहेत. सलमान खानचा हा शो 2 ऑक्टोबरपासून रिलीज होणार आहे. शोबाबत सतत बातम्या येत असतात, अशा स्थितीत गुरुवारी बिग बॉसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या.]

व्हिडिओ कॉलद्वारे सलमान खाननेही यात भाग घेतला. तर देवोलीना भट्टाचार्य आणि आरती सिंह यांनी ही प्रेस कॉन्फरेंस होस्ट केली. या दरम्यान, कलाकार खूप धम्माल करताना दिसले.काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये बिग बॉस 15 च्या काही स्पर्धकांच्या नावांवर शिक्का मारण्यात आला होता.

या दोन नावांवर शिक्का
बिग बॉस 15 च्या पत्रकार परिषदेत दोन स्पर्धकांची नावे उघड झाली. त्यापैकी एक असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि दुसरी अभिनेत्री डोनल बिश्तही या शोचा भाग असतील. दोघेही व्हिडीओ कॉलद्वारे या पत्रकार बैठकीला उपस्थित राहिले.

काय असेल विशेष?
यावेळी बिग बॉस 15 ची थीमही खूप खास आहे. सलमान खानच्या या शोची थीम जंगलावर आधारित आहे. सर्व स्पर्धक 250 कॅमेऱ्यांच्या कैदेत असतील. असेही वृत्त आहेत की यावेळी हा शो 5 महिने चालू शकतो. सलमान खानने पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, 'जंगलात मंगल किंवा जंगलात दंगल. मला हसणारे चेहरे, मर्यादा मारामारी, थोडा प्रणय आणि खेळ कसा खेळायचा हे पाहायचे आहे. मला काही लोकांना स्वतःसाठी आणि काही त्यांच्या प्रियजनांसाठी लढताना पाहायचे आहे.

या नावांचीही चर्चा 

बिग बॉस 15 साठी टीव्हीचा लोकप्रिय चेहरा करण कुंद्रा देखील सलमान खानच्या शोमध्ये दिसण्यासाठी तयार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी प्रकाश, विशाल कोटियन, आकासिंग, सिम्बा नागपाल, अफसाना खान यांची नावे पुष्टी केल्याप्रमाणे सांगितली जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 15 ची जंगल थीम रुबिना दिलैक, गौहर खान आणि श्वेता तिवारी यांच्या टीमसोबत सुरू होणार आहे. बिग बॉस 14 मध्ये गौहर खान, हिना खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या टीममध्ये बिग बॉसचा खेळ सुरू झाला.