'टीव्हीवर कमी दाखवलं, मी...'; ईशासोबत टेलिव्हिजनवर रोमान्स करण्याबाबत समर्थचं नजरा वळवणारं वक्तव्य

Samarth Jurel on romance with Isha Malviya in Bigg Boss 17 : समर्थनं आणि ईशा मालवीयसोबतच्या त्याच्या ऑनस्क्रिन रोमान्सवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 18, 2024, 04:34 PM IST
'टीव्हीवर कमी दाखवलं, मी...'; ईशासोबत टेलिव्हिजनवर रोमान्स करण्याबाबत समर्थचं नजरा वळवणारं वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Samarth Jurel on romance with Isha Malviya in Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' शोमधून समर्थ जुरेल बाहेर पडला आहे. त्यानंतर समर्थननं त्याच्या आणि ईशा मालवीयच्या नात्यावर आणि त्यासोबत अभिषेक कुमारला लगावलेल्या कानशिलावर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर पुढे सर्थला पुढे विचारण्यात आलं की तो कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ईशाला किस करायचा आणि तिच्यासोबत कोजी व्हायचा. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर त्याला आता या सगळ्याची लाज वाटते का? या प्रश्नावर समर्थनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. या सगळ्या गोष्टीवर समर्थ त्याच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिसला. 

समर्थनं ही मुलाखत सिद्धार्थ कननला दिली होती. यावेळी सिद्धार्थ कनननं सांगितलं की 'तुला इमरान हाश्मीचं टॅग देण्यात येत आहे. त्याचं कारण तू सगळ्यांसमोर रोमान्स करायचा हे आहे. तर आता तुला या सगळ्याची लाज वाटते का?' त्यावर उत्तर देत समर्थ म्हणाला, 'कोजी मी जितका आहे... हे तिथे खूप कमी दाखवलंय. रोमॅन्टिक होणं काही चुकीचं नाही. हा कुठेच नियम नव्हता की तुम्ही किस करू शकत नाही. मी खऱ्या आयुष्यात देखील असाच आहे. अंकिता जी नं देखील मला बाहेर येताच किस केलं. मिठी मारली. ती मला लहान भाऊ मानते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिताविषयी केलेल्या या वक्तव्यावर समर्थला पुढे प्रश्न विचारण्यात आला की 'भाऊ-बहिणीत जसं किस करतात तसं किस तर नाही केलंस ईशाला?' यावर उत्तर देत समर्थ म्हणाला, 'मी सांगतोय की कोणत्याही नात्यात मिठी मारणं, किस करणं या सगळ्या गोष्टी साधारण आहेत. त्यामुळे मी जे केलं ते चुकीचं नाही.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिषेकला लगावलेल्या कानशिलावर वक्तव्य

समर्थनं पुढे अभिषेकला लगावलेल्या कानशिलाच्या वादावर वक्तव्य केलं आणि सांगितलं की 'अभिषेकला पोक करून त्यानं काहीही चुकीचं केलेलं नाही. अभिषेकनं ईशाला अशा अनेक गोष्टी बोलल्या ज्या एक बॉयफ्रेंड म्हणून मी ऐकू शकत नव्हतो. हो, पण मी हे पण बोलत नाही की मी योग्य आहे. मी जे केलं ते पण योग्य नव्हतं, पण अभिषेक देखील योग्य करत नव्हता.'