मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'बिग बॉस 17'चा सीझन गाजवत आहे. नेहमीच ती या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. या घरात तिच्यासोबत तिचा पती विकी जैनदेखील आहे. नुकतंच या आठवड्याच्या एलिमिनेशनची घोषणा झाली. जे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर याचबरोबर अंकिताने मुनव्वरसोबत बोलताना तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंगबद्दल मोठं वक्तव्य केलं यावेळी बोलतान ती म्हणाली की, जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा तिचं बोलणं कोणीच ऐकून नाही घेतलं. आणि तिच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला.
यानंतर तिच्या संभाषणावेळी मुन्नावर ते तिला एक शायरी ऐकवली. अंकिता मुनव्वरसोबत बोलताना म्हणाली, नको बोलूस हे सगळं. कारण हे वाईट दिवसांची आठवण करुन देतात. पण तु जे बोललास ते मला खूप आवडलं.'' यानंतर मुन्नवर आपली कविता पुर्ण करतो आणि लगेजच अंकिता 'कौन तुझे प्यार करेगा' हे गाणं गाऊ लागते.
यानंतर मुनव्वर अंकिताला म्हणतो. 'मी सुशांतसोबत स्पेशल स्क्रिनिंग पाहिलं होतं त्याच्या यशराज स्टूडिओमध्ये.' यानंतर अकिता म्हणते, ''वा खूप छान'' यानंतर मुनव्वर म्हणतो, ''ही एकमेव मला संधी होती त्याला भेटण्याची.''
पुढे अंकिता म्हणते, ''खूप मस्त व्यक्ती होती ती. मी असं कधी बोलत नाही मला विचित्र वाटतं. म्हणजे आता तरी ठिक आहे सगळं नॉर्मल झालं आहे. विकीचा सुद्धा मित्र आहे सुशांत. आता तो या दुनियेत नाही राहिला. माझ्यासाठी हे सगळ्यात वाईट फिलींग आहे. ''यानंतर अंकिताला मुनव्वर विचारतो, ''तुला तर सगळं खरं-खोट माहिती आहे की, त्याच्यासोबत नक्की काय झालंय.'' यावर अंकिता म्हणते, मी आता यावर बोलू ईच्छित नाही. मात्र असंही नाही की, मला तुला काही सांगायचं नाही.''
मुनव्वर पुढे म्हणतो, ''मी तुला विचारत नाही आहे'' यानंतर अंकिता म्हणते मला माहितीये हं! पुढे मुन्नवर म्हणतो, लोकांची वर्जन वेग-वेगळी आहेत मात्र त्यात एक आहे. जिला सगळं माहिती आहे. याशिवाय, अंकिताने खुलासा केला की, कोणीही माझ्यावर त्यावेळी विश्वास ठेवला नाही. पण तो नाही हे ठीक आहे. एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून जाते.. असा कोणीतरी गमावण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. असा प्रकार घडला हे अतिशय धक्कादायक होतं. अंकिता पुढे म्हणाली 'मी त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊ शकलो नाही. मला वाटले की मी हे पाहू शकत नाही.'