लग्नाच्या 6 वर्षांनंतर करवा चौथलाच 41 वर्षीय अभिनेत्री बनली आई, 'या' अभिनेत्याच्या घरात आनंदी आनंद

लोकप्रिय टीव्ही जोडपे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या घरी लग्नाच्या 6 वर्षांनंतर पाळणा हलला आहे. करवा चौथच्या शुभदिनी त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं.   

नेहा चौधरी | Updated: Oct 22, 2024, 09:16 AM IST
लग्नाच्या 6 वर्षांनंतर करवा चौथलाच 41 वर्षीय अभिनेत्री बनली आई, 'या' अभिनेत्याच्या घरात आनंदी आनंद

यंदाचं करवा चौथ हे अभिनेता प्रिन्स नरूला आणि युविका चौधरीसाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरलंय. कारण हे दोघे आई बाबा झाले असून त्यांना गोंडस मुलगी झालीय. बिग बॉस 9 मध्ये हे दोघे प्रेमात पडले. लग्नाच्या 6 वर्षांनंतर यांच्या घरी पाळणा हलला आहे. अनेक प्रयत्नानंतर अभिनेत्री IVF च्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला.

Add Zee News as a Preferred Source

त्यांनी ही आनंदाची बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता त्याने हॉस्पिटलमधून लहान परीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. (bigg boss 9 winner and MTV Roadies prince narula yuvika chaudhary become parents baby girl first photo )

युविका चौधरीने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की, ती खूप दिवसांपासून बाळासाठी प्रयत्न करत होती. जून 2024 मध्ये तिने घोषणा केली होती की ती आई होणार आहे. त्यांना रविवारी 20 ऑक्टोबरला मुलगी झाली. रोडीज ऑडिशन दरम्यान प्रिन्स नरुलाने वडील झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली, पण कामामुळे तो पत्नी युविकासोबत नव्हता. करवा चौथच्या निमित्ताने तिने पती प्रिन्सला जगातील सर्वात मौल्यवान भेट दिली.

बाळाची पहिली झलक दाखवणारा पहिला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता करवा चौथ असल्याने युविकाचा हातावर मेहंदी आहे. शिवाय ती हॉस्पिटलमधील कपड्यामध्ये दिसतंय. तर प्रिन्सने आपल्या लेकीचा जवळ घेतलं. पण या फोटोमध्ये त्यांनी लेकीचा चेहरा दाखवला नाही. लेकीच्या चेहऱ्यावर बाळाचा स्माइली लावली आहे. 

रोडीजमध्ये प्रिन्ससोबत दिसलेल्या रणविजय सिंघाचे रणविजयने अभिनंदन केले , त्याने अभिनेत्याचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली. तो त्याच्या पोस्टमध्ये लिहितो, 'सर्वात सुंदर क्षण तो होता जेव्हा प्रिन्सने घोषणा केली की तो बाप झाला आहे. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. आपण सर्व नशीबवान आहोत की आपण मुलींचे वडील आहोत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

प्रिन्सने युविकाला नॅशनल टीव्हीवर प्रपोज केलं होतं. ह्रदयाच्या आकाराची चपती बनवून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. युविका आणि प्रिन्स 2018 साली लग्नाच्या बंधनात अडकलेत. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More