शिव ठाकरे कोणाच्या प्रेमात? रोमान्सचा फोटो व्हायरल, सलमानच्या नायिकेशी संबंधित नाव

बिग बॉस फेम शिव ठाकरे सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिव ठाकरे मिस्ट्री गर्लच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 1, 2024, 07:41 PM IST
शिव ठाकरे कोणाच्या प्रेमात? रोमान्सचा फोटो व्हायरल, सलमानच्या नायिकेशी संबंधित नाव title=

Shiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. अलीकडेच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते विविध प्रकारचे अंदाज लावत आहेत.

बिग बॉस 16 शोमधील त्याच्या कामगिरीने तो फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला.त्यानंतर शिव ठाकरे हा 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये दिसला. शिव ठाकरे हा अनेक रिॲलिटी शोचा भाग बनला आहे. तो आतापर्यंत कोणाशीही त्याच्या नात्याबद्दल उघडपणे बोलला नाही, मात्र, आता त्याच्या नवीन इन्स्टाग्राम स्टोरीमुळे सध्या तो तुफान चर्चेत आला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत 

काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका मुलीच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. मात्र, त्याने चित्रात मुलीचा चेहरा इमोजीने झाकला आहे. हे चित्र समोर येताच लोकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली. मात्र, या पोस्टवर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. 

या मुलींच्या नावाची चर्चा

शिव ठाकरेचा हा फोटो पाहून चाहते खूप खुश दिसत आहेत. चाहत्यांनी त्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. फोटो पाहून चाहत्यांनी अंदाज लावले आहेत. ज्यामध्ये एका युजरने सौंदर्याचे नाव लिहिले. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, फोटोमध्ये दिसणारी मुलगी प्रियांका चहर आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी डेजी शाहचे नाव घेतले आहे. काही यूजर्स ती अर्चना असल्याचे म्हटलं आहे.