Youtuber Armaan Malik Accident : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो आणि त्यातील स्पर्धक हे नेहमीच चर्चेच असतात. अशात तो शो संपला तरी त्या शोमध्ये दिसलेले लोक हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तर 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसलेला युट्यूबर अरमान मलिकला घेऊन एक मोठी अपडेट समोर आली आहे. अरमान मलिकच्या गाडीचा भयानक अपघात झाला आहे. तर त्याच्या गाडीची अवस्था पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अरमान मलिक हा नेहमीच त्याच्या दोन पत्नींमुळे चर्चेत असायचा. आता त्यानं शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. अरमान मलिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरमाननं सांगितलं की एक आठवड्याआधी मी या गाडी संदर्भात तक्रार दाखल केली होती आणि आज तेच झालं. आज आम्ही मनालीवरून गाणं शूट करून येत होतो. तेव्हा गाडीचा टायर फुटला आणि त्यासोबत त्यानं गाडीचे दोन्ही टायर फुटल्याचे दाखवले. पुढे सांगत अरमान म्हणाला, गाडीचे टायर फुटल्यानं गाडी अनबॅलेन्स झाली. आम्ही मृत्यूच्या दारातून परत आलोय. मी गाडीत झोपोत होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका आणि लक्ष मागे बसले होते. आमच्यासोबत जी घटना झाली. खरंतर, देवाच्या कृपेनं आम्ही बचावलो. त्यानंतर त्यानं या गाडीचं मॉडेल वगैरे देखील सांगितलं.
अरमाननं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत त्याची चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर काही काळात अरमान मलिकनं त्याचं कॉमेंट सेक्शन बंद केलं.
हेही वाचा : अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली मलायका- 'मला काहीच पश्चाताप नाही!'
दरम्यान, यूट्यूबर अरमान मलिकनं तीन वेळा लग्न केल्याचं म्हटलं जातं. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अरमान मलिकनं पायल मलिकशी लग्न केलं. त्यानंतर पायलशी लग्न केलंलं असताना त्यानं तिचीच मैत्रिण कृतिकाशी लग्न केलं. अरमान त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकासोबत 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये पोहोचला होता. तर त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.