Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला वाटतेय जिजू राज कुंद्राची काळजी

बिग बॉस ओटीटीमध्ये सगळ्या स्पर्धकांच्या घरचे सदस्य बिग बॉस ओटीटीमध्ये आले होते.

Updated: Sep 17, 2021, 08:22 PM IST
Bigg Boss OTT:  शमिता शेट्टीला वाटतेय जिजू राज कुंद्राची काळजी

मुंबई : बिग बॉस ओटीटीमध्ये सगळ्या स्पर्धकांच्या घरचे सदस्य बिग बॉस ओटीटीमध्ये आले होते. आई सुनंदा शेट्टीदेखील शमिता शेट्टीला भेटायला आली होती. आईला पाहून शमिता शेट्टी भावूक झाली. बिग बॉस ओटीटीचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात शमिता शेट्टी खूप भावनिक झालेली दिसत आहे. शमिता तिच्या आईला पाहून तिच्याकडे धावत जाते. या व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, शमिता शेट्टी बहीण शिल्पा शेट्टी आणि जिजू राज कुंद्राबद्दल विचारते.

बिग बॉस ओटीटीच्या या व्हिडिओमध्ये, शमिता शेट्टी आईला विचारते की, 'दीदी आणि जिजू कसे आहेत?' यावर तिची आई तिला उत्तर देते की, सगळं काही ठीक आहे. सुनंदा शेट्टी पुढे म्हणते, 'मला तुझा अभिमान आहे. तुझ्या बहिणीला तुझा अभिमान आहे. वियानने तुमझ्यासाठी खूप प्रेम पाठवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मी स्ट्राँग आहे तुम्ही स्ट्राँग आहात आणि आमच्या कुटुंबात तीन स्त्रिया आहेत आणि त्या तिघंही स्ट्राँग आहेत. मला असं हवं आहे. चढ -उतार हा जीवनाचा भाग आहे. अशाप्रकारे, तिची आई मुलीला प्रेरणा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. बिग बॉस ओटीटीचा शेवट 18 सप्टेंबरला होणार आहे. प्रतीक सहजपाल, दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, राकेश बापट आणि निशांत भट हे स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत.