बर्थ डे स्पेशल : हृता दुर्गुळेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

तिच्या खास गोष्टी 

बर्थ डे स्पेशल : हृता दुर्गुळेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

मुंबई : झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा आज वाढदिवस. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका आणि मालिकेतील कलाकार. हृतावर अगदी संपूर्ण महाराष्ट्र भरभरून प्रेम करतो. तिचा एक वेगळा फॅन क्लब आहे. आज हृताचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

हृता दुर्गुळेच्या खास गोष्टी

  • हृता दुर्गुळे ही मुळची मुंबईची दादरची आहे. तिचा जन्म 12 सप्टेंबर 1990 रोजी झाला आहे. 
  • हृताचं माध्यमिक शिक्षण हे IESCN सुळे गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालं असून हृताने मास मिडिया ही पदवी रुईया कॉलेजमधून केलं आहे. 
  • हृता हि मुळची दादर मुंबई ची आहे आणि ती साधारणता मध्यम वर्ग कुटुंबातील असून तिच्या कुटुंबामधील अभिनय क्षेत्रामध्ये कोणीही नाही आहे. फक्त जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हृता एवढया उंचीवर पोहचली आहे.
  • हृताने सुरुवातीला स्टार प्रवाह वरील दुर्वा मालिकेमध्ये काम केले. आणि तिथूनच तिच्या अभिनय क्षेत्राला सुरुवात झाली. यापूर्वी तिने कॉलेज आणि शाळेमध्ये खूप सारी पारितोषक मिळवले आहेत.
  • आपल्याला माहितच आहे हृता दुर्गुळेचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी अभिनेत्री आहे. हृताच्या या यादीत 6 वा क्रमांक केला आहे. हृताचे इंस्टाग्राम अकाऊंटवर 6 लाख 58 हजार फॉलोअर्स आहेत. तसेच हृता ही पहिली अभिनेत्री आहे जिथे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॅन्सग्रुप आहेत.
  • अभिनयाबरोबरच तिला एका गोष्टीची खूप भीती वाटते ती म्हणजे गाण्याची. 

  • हृताचा आवडता अभिनेता विक्की कौशल... त्याचे मसान आणि संजू हे सिनेमे हृताला आवडले. 
  • हृता आणि वैदेही यांच्यातील साम्य समंजसपणा...