सलमान खान बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेतो इतके कोटी

सलमान बिग बॉसमधून कमवणार यंदा इतके कोटी रुपये

Updated: Sep 12, 2018, 12:08 PM IST
सलमान खान बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेतो इतके कोटी

मुंबई : सलमान खान होस्ट करणार शो 'बिग बॉस' लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा सुरु होतो आहे. मंगळवारी सलमान खानने गोवा येथे या शोचं लॉन्चिंग करण्यात आलं. या शोचा फॉरमॅट आणि कंटेंट नेहमी चर्चेत असतो. पण या शोमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी नेहमी चर्चेत असते. सलमान खान हा शोचा प्राण आहे. त्यामुळे तो या शोसाठी किती पैसे याबाबत देखील नेहमी चर्चा असते. शो सुरु होण्यासाठी एक आठवडा बाकी आहे. त्यातच सलमान या शोसाठी किती पैसे घेतो याबाबत चर्चा रंगली आहे.

'बिग बॉस 12' मध्ये सलमान खान एका एपिसोडसाठी 14 कोटी रुपये घेतो. सलमान खान संपूर्ण बिग बॉसमध्ये एकूण 300 कोटी रुपये कमवेल. मागच्या वर्षी सलमान खानने एका एपिसोडसाठी 11 कोटी रुपये घेतले होते. 'बिग बॉस 12' चा पहिला एपिसोड 16 सप्टेंबरला प्रसारित होणार आहे. 6 सेलिब्रिटी यंदा बिगबॉसच्या घरात असतील अशी चर्चा होती. सोबतच 5 कॉमन जोड्या देखील असतील. त्यानंतर या जोड्यांना विचित्र नावं दिली जातील.

अभिनेत्री माहिका शर्मा एका ब्रिटीश अडल्ट स्टार डॅनी डी सोबत जोडी बनवून या शोमध्ये येईल अशी देखील चर्चा होती. डॅनी डी त्याची पार्टनर माहिका शर्मासोबत शोमध्ये येण्यासाठी प्रत्येक आटवड्यात 95 लाख रुपये घेणार आहे.