मुंबई : सिनेसृष्टीत ट्रेडिशनल लूकमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत सामिल झाली आहे. एकेकाळी खूप जाड असलेल्या या अभिनेत्रींची गणती आता फिट अभिनेत्रींमध्ये होते. सोनाक्षीचा जन्म २ जूनला झाला. तर तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
# सोनाक्षीला पेटींग आणि स्केच बनवण्याचा छंद आहे. तिच्या लुटेरा सिनेमातही ती पेटींग करताना दिसली होती. लहानपणापासूनच तिला साडी नेसायला खूप आवडते.
# सोनाक्षीने अनेक गाण्यांमध्ये रॅपिंग केली आहे. दबंग, रावडी राठौड, हिम्मतवाला, बुलेट राजा, तेवर, अकीरा या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतूक झाले आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा तिचा आवडता सिनेमा.
# सोनाक्षीला सलमान खानने सिनेसृष्टीत आणले. तिला स्पॉट केल्यानंतर सलमानने तिच्यातील अभिनय कौशल्य जाणले. व त्यानंतर सोनाक्षीने ३० किलो वजन कमी करुन सलमानसोबत दबंग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सोनाक्षीने तिची पहिली कमाई सलमानच्या एनजीओला बिईंग व्यूमनला दान केली.
# सोनाक्षी आपल्या अभिनयाबरोबर अफेअर्समुळे देखील चर्चेत राहीली. २०१२ मध्ये सोनाक्षीचे नाव बंटी सचदेवासोबत जोडण्यात आले. बंटी सचदेवा सलमानची वहीनी सीमा खानचा भाऊ आहे. त्याचबरोबर सोनाक्षीचे नाव अर्जून कपूर, रणवीर सिंग आणि शाहीद कपूरसोबतही जो़डण्यात आले होते.
# सोनाक्षी सिन्हाने हॉलिवूड मूव्ही 'रिओ 2' आणि 'राइज ऑफ़ दी गार्जियंस' च्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता.