मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच अभिनेता अभिषेक बच्चन AbhishekBachchan यालाही कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटरवरुन आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते.
शिवाय अभिषेकने त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आणि जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे बीएमसीने अभिषेकचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. 'तुम्ही केवळ नियमांचे पालन केल नाही तर जनतेला शांत राहण्याचे देखील आवाहन केले त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी आशा करतो', असं ट्विट बीएमसीने केलं आहे.
Thank you @juniorbachchan for not just duly complying to the guidelines but also for urging all citizens to stay calm and safe. We wish you and @SrBachchan good health and speedy recovery. https://t.co/eHOeBYOR4C
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 12, 2020
आता समस्त बच्चन कुटुंबीयांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि आराध्या यांचे एन्टीजेन टेस्ट (Antigen Test) रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे जया, ऐश्वर्या, आराध्या यांचे दुसरे कोरोना रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता व्यवस्थित आहेत. अमिताभ यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.