'अॅनिमल'नंतर बॉबी देओलला लागला जॅकपॉट, 1000 कोटींचे बजेट असणाऱ्या चित्रपटात एन्ट्री, 'या' सुपरस्टारसोबत दिसणार

बॉबी देओलच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 'अॅनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता त्याची साउथच्या एका चित्रपटात त्याची एन्ट्री झाली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 2, 2024, 02:17 PM IST
'अॅनिमल'नंतर बॉबी देओलला लागला जॅकपॉट, 1000 कोटींचे बजेट असणाऱ्या चित्रपटात एन्ट्री, 'या' सुपरस्टारसोबत दिसणार  title=

Thalapathy 69: 'अॅनिमल' चित्रपटात वेगळ्या भूमिकेमुळे खळबळ माजवल्यानंतर बॉबी देओल पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी येत आहे. अभिनेता लवकरच 'थलपती 69' मध्ये दमदार अवतारात दिसणार आहे. 

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल त्याच्या दमदार अभिनय आणि पात्रांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतो. नुकताच तो त्याच्या एका प्रोजेक्टमुळे सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटासाठी आयफा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. बॉबी देओल लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहे. 

'थलपती 69' बॉबी देओल दिसणार 

'थलपती 69'  हा साउथ सुपरस्टार अभिनेता विजयचा शेवटचा चित्रपट असू शकतो. कारण त्याने काही दिवसांपूर्वी 'तमिझगा वेत्री कळघम' या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे बॉबी देओलची या चित्रपटात सहभागाची घोषणा केली आहे. 'थलपती 69' च्या कलाकारांमध्ये सामील झाल्याची घोषणा करताना आनंदी आणि उत्साही आहे असं निर्माते म्हणाले. 

याआधी विजयच्या दुहेरी भूमिकेने खळबळ उडवून दिली होती. 'थलपती 69' तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. जे सर्व प्रेक्षकांना एकत्र जोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हा चित्रपट विजयच्या तीन दशकांच्या शानदार कारकिर्दीला एक विशेष परिमाण जोडेल आणि देशभरातील चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रशांत, प्रभू देवा, जयराम, मोहन, स्नेहा, लैला, अजमल अमीर आणि मीनाक्षी चौधरी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.