Shraddha Walkar Murder Case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आरोपी आफताब पुनावाला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहार जेल प्रशासन आरोपीच्या सुरक्षेची समीक्षा करु शकते. शुक्रवारी ही माहिती समोर आली आहे. श्रद्धा वालकर मर्डर केसमधील आरोपी आफताब पूनावाला नोव्हेंबर 2022 पासून तिहार जेलमध्ये आहे. त्याने लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन मैहरोली जंगलात फेकले होते.
पूनावालाच्या सुरक्षेसाठी त्याला सध्या तिहार जेल संख्या 4च्या एकांत कोठडीत ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आणि सोशल मीडिया पोस्टनुसार महाराष्ट्रात एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांसमोर काही खुलासे केले आहेत. त्यानुसार, पुनावालादेखील बिश्नोईच्या निशाण्यावर आहे.
तिहार जेलच्या एका अधिकाऱ्यांने सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत आम्हाला पोलिस किंवा सुरक्षा रक्षकांकडून काहीही माहिती मिळाली नाहीये. पूनावालाला लॉरेन्स बिश्नोईकडून धोका आहे, अशी सूचना आम्हाला मिळालेली नाहीये. जर आम्हाला अशी कोणती सूचना मिळाली तर आम्ही त्याच्या सुरक्षेची समीक्षा करु शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे परिसरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळ्या झाडल्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होत्. मात्र, छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीका यांच्या हत्येची जबाबदारी जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याने घेतली होती. सध्या लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती जेलमध्ये आहे. तर, त्याचा साथीदार तिहार जेलमध्ये आहे.