मुंबई : तीन महिन्यापासून आपण सर्वजण मोठ्या संकटात अडकलेले आहोत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग अधिक कठोरपणे पाळण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसेच शासनाने सर्वाना घरात राहण्याची व कोणत्याही धार्मिक स्थळी गर्दी न करण्याची विनंती केली आहे. आपण सर्वांनी घरात राहून कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत व सकारात्मक विचार करून या संकटाशी दोन हात केले पाहिजेत.
या संकटामुळे आपण सर्वजण या वर्षी आषाढी वारीला मुकलो आहोत. म्हणूनच या सर्वांसाठी "झी टॉकीज" "आषाढी एकादशी" निमित्त घेऊन येत आहे ,एक सांगीतिक नजराणा "बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल" १ जुलै रोजी रात्री ८. ३० वाजता.आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठलाला साद घालण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या २ तासांच्या सांगीतिक भेटीत प्रेक्षकांना गायन, वादन, नृत्य, भारूड, भजन अश्या अनेक कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. झी टॉकीजच्या या कार्यक्रमातून पहिल्यांदाच भारतरत्न प . भीमसेन जोशी यांचे स्वर्गीय सूर अनुभवता येणार आहेत .पंडितजींची अभंगवाणी ऐकताना लहानां पासून ते जेष्ठां पर्यंत, सगळेच विठ्ठलाशी एकरूप होऊन जातात. याशिवाय आर्या आंबेकर, आदर्श शिंदे, कार्तिकी गायकवाड, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, आदिनाथ कोठारे हे सर्व लाडके कलाकार/ गायक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन सादर होणार आहे तर धुंडा महाराजांचा आदर्श घेवून भारूड सादरीकरणाला सुरूवात करणाऱ्या, भारूडाची पंरपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील जेष्ठ लोककलावंत "चंदाताई तिवाडी" भारूड सादर करणार आहेत. या कठीण काळात पांडुरंगाशी एकरूप होत ,सकारात्मक राहण्याची प्रेरणा आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची एक अनोखी संधी "झी टॉकीज" वर प्रेक्षकांना मिळणार आहे .
आषाढी एकादशीचे औचित्य साधून विठूनामाच्या गजरात एकरूप होण्यासाठी पाहायला विसरु नका "बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल" १ जून २०२० रोजी रात्री ८. ३० वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.