चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका 'या' वेबसिरीज; पाहाताना दार बंद करा

ओटीटी बोल्ड आणि हॉट वेब सिरीजने भरलेलं आहे.

Updated: Jun 13, 2022, 04:30 PM IST
चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका 'या' वेबसिरीज; पाहाताना दार बंद करा title=

मुंबई : ओटीटी बोल्ड आणि हॉट वेब सिरीजने भरलेलं आहे. तुम्हीही ही वेब सिरीज पाहण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुमच्या खोलीचे दरवाजे नक्कीच बंद करा आणि कुटुंबासोबत चुकूनही बघू  नका.

Rasbhari 
प्राईम व्हिडीओच्या या सिरीजमध्ये स्वरा भास्करने मुख्य भूमिका साकारली असून ती यात खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. स्वरा एक अशी शिक्षिका बनली आहे जिच्या प्रेमात तिचे विद्यार्थी देखील पडतात. या सिरीजमध्ये बोल्ड सीन्सची कमी नाही.

Mirzapur
मिर्झापूरमध्ये 1 पेक्षा जास्त बोल्ड सीन्स आहेत. मिर्झापूर 2. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा यांसारख्या स्टार्सनी सजलेली ही सिरीज सर्वाधिक चर्चेत असलेली सिरीज आणि सर्वात बोल्ड देखील आहे. ही सिरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक अजिबात करू नका. 

Four More Shots
ही सिरीज चांगलीच पसंतीस उतरली आहे. सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी आणि मानवी गाग्रू यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सिरीजमध्येही बोल्ड आणि हॉट सीन्सची कमी नाही. 

Made in Heaven
ही सिरीज हाय प्रोफाईल लग्नाच्या वेगवेगळ्या कथांवर असली तरी सिरीजच्या मध्यभागी असे अनेक सीन्स आहेत जे तुम्हाला कुटुंबासोबत बघायला लाज वाटतील. अशा परिस्थितीत ही सिरीज कुटुंबासोबत पाहण्यासारखी नाही. 

Skulls and Roses
ही वेब सिरीज नसून याला वेब रिअॅलिटी शो नक्कीच म्हणता येईल. हा एक रिअ‍ॅलिटी शो होता ज्यात बोल्डनेस आणि हॉटनेस जबरदस्त होता.