अर्जुन कपूरच्या कुटुंबात चिमुकलीच्या येण्यानं आनंदाला बहर

पाहा सेलिब्रिटी Family ची नवी सदस्य  

Updated: Nov 22, 2021, 05:14 PM IST
अर्जुन कपूरच्या कुटुंबात चिमुकलीच्या येण्यानं आनंदाला बहर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबातील प्रत्येक घडामोडीवर चाहत्यांचं लक्ष आहे. निमित्त ठरत आहेत ती म्हणजे या कुटुंबाशी संबंध असणाऱ्या काहीजणांची लग्न, साखरपुडे, अफेअर्स आणि बरंच काही. 

सध्या बॉलिवूडमधील अशाच एका कपूर कुटुंबामध्ये सध्या आनंदाला बहर आला आहे. 

आनंद द्विगुणित होण्यामागचं कारण ठरत आहे, ते म्हणजे या सेलिब्रिटी कुटुंबात आलेली एक चिमुकली. 

कपूर कुटुंबाचाच एक भाग असणाऱ्या मोहित मारवा आणि त्याची पत्नी, अंतरा मारवा यांच्या घरी जवळपास महिन्याभरापूर्वी एका लहान मुलीचा जन्म झाला. 

लेकीला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मोहितच्या पत्नीनं म्हणजेच अंतरानं सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. 

फोटोमध्ये मोहित लेकिला मोठ्या प्रेमानं न्याहाळताना दिसत आहे.  अंतराने हा फोटो शेअर करत मुलीच्या जन्मतारखेचाही उल्लेख केला. 

मोहितच्या पत्नीनं ही पोस्ट केल्यानंतर त्यावर त्याच्या बहिणी, सोनम कपूर, रिया कपूर, शनाया कपूर, खुशी कपूर यांनीही कमेंट केल्या. 

मोहित हा अर्जुन कपूरचा Cousin आहे. ज्यामुळं त्याच्या लेकिच्या येण्यानं कपूर कुटुंबात कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. 

2018 मध्ये मोहित आणि अंतरा विवाहबंधनात अडकले होते. या लग्नाच्याही बॉलिवूडमध्ये बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.