Actors Controversial Life: पत्नीसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेता 15 वर्षांनी लहान Girlfriend सोबत Live in मध्ये

लग्न न करताच बॉलिवूड अभिनेता झाला बाबा... 

Updated: Aug 4, 2022, 02:21 PM IST
Actors Controversial Life: पत्नीसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेता 15 वर्षांनी लहान Girlfriend सोबत Live in मध्ये title=
Bollywood Actor arjun rampal Actors Controversial Life affair wedding relationship

मुंबई : बॉलिवूडच्या झगमगणाऱ्या या विश्वामध्ये घडणारे प्रसंग आणि त्यांच्या सातत्यानं होणाऱ्या चर्चा काही कमी नाहीत. या कलाजगतामध्ये आजवर अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्यातून प्रेमाची वेगळीच परिभाषा सर्वांसमोर आणली. काहींची नाती अपयशी ठरली, तर काहींनी नव्या नात्यांची सुरुवात करत एका नव्या आयुष्याला आपलंसं केलं. (Bollywood Actor arjun rampal Actors Controversial Life affair wedding relationship)

असाच एक अभिनेता त्याच्या 20 वर्षांच्या वैवाहितक नात्यातून बाहेर पडला, त्यानं पत्नीला घटस्फोट दिला आणि 15 वर्षांहून लहान असणाऱ्या प्रेयसीसोबत त्यानं लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली. 

लग्नाची बेडी नाही, कोणतीही वचनं नाहीत, फक्त प्रेमाच्याच बळावर या अभिनेत्यानं हे नातं निभावलं आणि सध्या तो एका मुलाचा बाबाही आहे. हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा हँडसम हंक अर्जुन रामपाल  (Arjun Rampal).

अर्जुन गेल्या काही दिवसांपासून गॅब्रिएला या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती त्याची लिव्ह इन पार्टनरही आहे. अर्जुनला या नात्यातून एक मुलगा आहे, ज्याचं नाव आरिक असल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच या लाडक्या लेकाचा वाढदिवस अर्जुन आणि त्याच्या पार्टनरनं साजरा केला होता. 

अर्जुननं त्याच्या कारकिर्दीत बरेच सरस चित्रपट दिले. त्यानं साकारलेल्या भूमिकांची दखल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येही घेण्यात आली. 1998 मध्ये अर्जुननं मेहर जेसिया हिच्याशी लग्न केलं होतं. मेहर आणि अर्जुनचं वैवाहिक नातं 20 वर्षे चाललं. त्यांना दोन  मुलीही आहेत. पण, एका वळणावर आल्यानंतरस या नात्यात ठिणगी पडली आणि त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. 

लग्नाच्या नात्यातून वेगळं झाल्यानंतर अर्जुननं त्याच्या आयुष्यात गॅब्रिएलाला महत्त्वाचं स्थान दिलं.