close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉलिवूडच्या बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीकडून रॅम्पवरच प्रेमाची ग्वाही

फॅशन, बॉलिवूड आणि प्रेम... 

Updated: Aug 22, 2019, 09:09 AM IST
बॉलिवूडच्या बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीकडून रॅम्पवरच प्रेमाची ग्वाही

मुंबई : कलाविश्व म्हटलं की अभिनय आला आणि अभिनय विश्व म्हटलं की ओघाओघाने येतं ते म्हणजे फॅशन जगत. पॅशन विश्वात बाहेरून अगदी लक्षवेधी वाटणारा झगमगाट अनेकांनाच हवाहवासा वाटतो, पण त्यामागेही असंख्य कालकारांचे हात काम करत असतात. अशाच इत्साही वातावरणात सध्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ला दणक्यात सुरुवात झाली आहे. मुंबईत सुरु झालेल्या या फॅशनच्या सोहळ्याला पहिल्याच दिवशी बऱ्याच सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळाली. 

सेलिब्रिटी फॅशन डिझायनरपासून ते सेलिब्रिटी शो स्टॉपरपर्यंत सगळीकडेच नुसती धमाल. यात बी- टाऊनचं मोस्ट हॅपनिंग कपलही मागे राहिलं नाही. हे कपल अर्थात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली सेलिब्रिटी जोडी म्हणजे, अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली देणाऱ्या या जोडीने लॅक्मे फॅशन वीकच्या एका फॅशन शोदरम्यान रॅम्पवरही त्यांच्या नात्याची ग्वाही दिली. फॅशन डिझायनर पायल सिंघलच्या कलाकारीला सर्वांसमोर सादर करत हे दोघंही सर्वांसमोर आले. लॅक्मे फॅशन वीकमध्ये पायलचं हे २०वं वर्ष. तिच्यासाठी फरहान आणि शिबानी हे शोस्टॉपर होते. 

पायलच्या कलेक्शनमध्ये हे दोघंही अतिशय सुरेख दिसत होते. यामध्ये चार चाँद लावून गेली ती म्हणजे या दोघांची केमिस्ट्री. शिबानी रॅम्पवर आल्यानंतर काही वेळाने फरहानही तिला साथ देत या दोघांनी कॅमेऱ्यासाठी एकत्र पोझ दिली. यावेळी त्यांच्यावरुन कोणाचीही नजर हटत नव्हती. जवळपास वर्षभरापासून फरहान- शिबानीच्या रिलेशनशिपने अनेकांची मनं जिंकली आहेत. किंबहुना येत्या काळात ही जोडी कधी एकदा लग्नबंधनात अडकते हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे.