कार्तिकला चाहतीनेच प्रपोज केलं अन्...

 एका चाहतीने तर आता ...

Updated: Sep 27, 2019, 04:28 PM IST
कार्तिकला चाहतीनेच प्रपोज केलं अन्...
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूडमध्ये नवोदित अभिनेत्यांपैकीच एक अशा आणि चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कार्तिक आर्यन याच्या लोकप्रियतेचा एव्हाना सर्वांनाच अंदाज आलेला असावा. पदार्पणातील चित्रपटापासूनच कार्तिक त्याचा चाहतावर्ग बनवण्यात यशस्वी ठरला. आता तर, त्याच्या चाहत्यांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. 

एखाद्या ठिकाणी चाहतीकडून फ्लाइंग किसचा स्वीकार करत, एखाद्या ठिकाणी त्यांचीच शाबासकी घेणाऱ्या या कार्तिकच्या एका चाहतीने तर आता चांगलंच धाडस केलं आहे. धाडस अशासाठी की, या चाहतीने कार्तिकला थेट प्रपोज केलं आहे. 

'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कार्तिकच्या घराबाहेर त्याची चाहती वाट पाहत होती. त्याची एक झलक पाहण्यासाठीच तिचा हा आटापिटा सुरु होता. अखेर कार्तिकला भेटण्याची संधी तिला मिळाली. मुख्य म्हणजे ही अनमोल संधी तिला मिळाली, याचा आनंद होताच. पण, तिने या पलीकडे जात कार्तिकला आश्चर्याचा धक्काच दिला. 

हा धक्का यासाठी होता की, घराबाहेर वाट पाहणाऱ्या त्या चाहतीने कार्तिकला चक्क प्रपोज केलं. गुडघ्यांवर बसून तिने त्याला प्रपोज केलं. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अनेकांनीच त्या चाहतीचं कार्तिकप्रती असणारं वेड पाहून हे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. त्यातीलच काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिकच्या चाहतीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. सोबतच कार्तिकही तिला पाहून आनंदात दिसत आहे. 

चाहत्यांचं अमाप प्रेम मिळवणारा हा अभिनेता सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. मुख्य म्हणजे, यासोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सर्वांचं लक्ष वेधत आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत कार्तिकचं नाव जोडलं जात आहे. तेव्हा आता खऱ्या आयुष्यात कार्तिक कधी आणि कोणाचं प्रपोजल स्वीकारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.