'तारक मेहता...' फेम दयाबेनच्या चाहत्यांसाठी खुशखबर

प्रसूती नंतर दिशा मालिकेपासून लांब आहे.

Updated: Sep 27, 2019, 03:44 PM IST
'तारक मेहता...' फेम दयाबेनच्या चाहत्यांसाठी खुशखबर

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतून घरा घरात पोहचलेली दया बेन म्हणजचेच दिशा वकानी कित्येक दिवसांपूर्वी छोट्या पद्यापासून दूर आहे. १७ सप्टेंबरला दिशाने 'तारक मेहता..'चा शेवटचा भाग शूट केला होता. प्रसूती नंतर दिशा मालिकेपासून लांब आहे. मुलीच्या जन्मानंतर दिशा मालिकेत परतली परंतू फक्त काही दिवसांकरता. त्यानंतर तिने 'दया बेन'च्या भूमिकेसाठी अधिक मानधनाची मागणी केली होती. 

परंतु निर्मात्यांनी तिची ही मागणी मान्य नव्हती. अखेर तिने असित मोदीयांच्या सोबत काम करण्यास होकार दिला आहे. 'दयाबेन' मलिकेत पुन्हा झळकणार आहे, रिपोर्टनुसार ती नवरात्रीच्या मुहूर्तावर २९ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मालिकेत आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. 

गेल्या काही भागांमध्ये जेठालाल पत्नी दयाबेनच्या अठवणीत व्याकूळ असलेले दिसत होते. अचानक जेठालालला दयाबेनची आठवण येणं आणि दयाबेनचं मालिकेत पुन्हा येणं हा एक योगायोगच असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता दिशा वकानी लवकरच मालिकेत पुन्हा झळकणार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.