एका चित्रपटासाठी कलाकार किती फी घेतात? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला '10 कोटीच्या..'

नवाजने नुकतंच कलाकारांच्या मानधनाबद्दल एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

Updated: Jan 26, 2024, 10:17 PM IST
एका चित्रपटासाठी कलाकार किती फी घेतात? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला '10 कोटीच्या..' title=

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर मनावरही विशेष छाप सोडली आहे. आता नवाज एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. नवाजने नुकतंच कलाकारांच्या मानधनाबद्दल एक वक्तव्य केले आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या 'सैंधव' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे त्याने तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला कलाकारांना मिळणारे मानधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फारच स्पष्टपणे उत्तर दिले. 

"काही चित्रपट फुकटात करतो"

नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला अंदाजे एखादा अभिनेता किती पैसे कमवतो? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने "ते खूप पैसे कमावतात", असे म्हटले. त्यावर त्याला 10 कोटी की त्यापेक्षा जास्त, असे विचारले असता त्याने "त्याच्याच जवळपास", असे नवाजुद्दीनने म्हटले. "मी काही चित्रपट हे फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने करतो. कारण मला काही चित्रपट पैसे न घेताही करता येतील. मंटोसारखे काही चित्रपट मी फुकटात करु शकलो कारण मी काही चित्रपट हे फक्त पैशांसाठी केले होते", असेही नवाजुद्दीन यावेळी म्हणाला. 

यापूर्वी एका मुलाखतीत नवाजने मी चित्रपटात छोट्या भूमिका करणे थांबवले आहे, असे सांगितले होते. मला जरी 25 कोटींची ऑफर आली तरी मी या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणार नाही. मी माझ्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत. त्यात मी छोटी पात्र साकारली आहेत. पण आता मात्र मी अशाप्रकारे छोट्या भूमिका करणार नाही, असे नवाजुद्दीने म्हटले आहे. 

दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी हा लवकरच 'सेक्शन 108' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीने सिद्दीकी, अरबाज खान आणि रेजिना कैसेंड्रा हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सेक्शन 108 हा मिस्ट्री थ्रिलर बॉलिवूड ड्रामा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रसिका खान यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.